Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपेठ प्रीमियर लीग स्पर्धेत ‘स्टार ॲटो’ विजेता

अकोले : तालुक्यातील इस्लामपेठ येथे माजी मंत्री स्व. मधुकरराव पिचड यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘इस्लामपेठ प्रीमियर लीग’ (आयपीएल) पर्व-५ क्रिकेट स्पर्

पोलीस ठाण्यांत अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करा : डॉ. अशोक गावित्रे 
महिलेने स्वतः सक्षम होणे गरजेचे : ऋतुजा गायकवाड
४५ गावांच्या पाणीपुरवठ्याचे स्वागत; मात्र १३ गावांच्या योजनेवर परिणाम नको : काकडे

अकोले : तालुक्यातील इस्लामपेठ येथे माजी मंत्री स्व. मधुकरराव पिचड यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘इस्लामपेठ प्रीमियर लीग’ (आयपीएल) पर्व-५ क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. माजी आमदार वैभवराव पिचड युवा मंच, इस्लामपेठ व शेर-ए-हिंद यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत ‘स्टार ॲटो’ संघाने विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत एकूण नऊ संघांनी सहभाग घेतला होता. माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सलग पाचव्यांदा आयोजित करण्यात आली. स्पर्धेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. तसेच वैभवराव पिचड यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली. 

 स्पर्धेतील प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये बाळासाहेब वडजे, द्वितीय पारितोषिक १५ हजार रुपये सुनील दातीर व तृतीय पारितोषिक ७ हजार ५०० रुपये अब्दुलशेठ ईनामदार यांनी प्रायोजित केले होते.

 बक्षीस वितरण सोहळा अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल अमोल वैद्य, उद्योजक रामनाथ कळसकर, हाफिज मौजूद शेख, तोफिक शेख, हाफिज इस्माईलखान पठाण, हाफिज अबुबकर पठाण, प्रा. सलिम शेख, मोहसिन शेख, नानासाहेब जरेकर आदींच्या हस्ते पार पडला.

 स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये अंतिम सामनावीर व ऑरेंज कॅप अरबाज शेख, पर्पल कॅप मोनू शेख, ‘मॅन ऑफ द सिरीज’ शादाब शेख, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक झैद शेख, उत्कृष्ट झेल समीर शेख, उत्कृष्ट समालोचक बाजीराव ढगे, तर उत्कृष्ट पंच म्हणून मुन्ना शेख व झहीर शेख यांचा सन्मान करण्यात आला.

COMMENTS