Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षणशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही ः दिनेश लव्हाट

साखळी उपोषणाचा सातवा तर आमरण उपोषणाचा चौथा दिवस

शेवगाव तालुका ः सकल मराठा समाजाची वेदना घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला मराठ्यांचा लढा हि मराठा समाजाची पिढ्यानपिढ्याची वेदना आहे. मराठा सम

शिवचरित्र व्याख्याता ओंकार व्यवहारे याने सादर केला ‘शिवतीर्थ’चा देखावा
सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरची शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम
रायगडावर अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

शेवगाव तालुका ः सकल मराठा समाजाची वेदना घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला मराठ्यांचा लढा हि मराठा समाजाची पिढ्यानपिढ्याची वेदना आहे. मराठा समाजाचा हुंकार म्हणुन मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला लढा हा परिवर्तनाचा लढा आपल्याला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने शांततेच्या मार्गाने लढायचा आहे. व जरांगे पाटलांना बळ देण्यासाठी साठी आता मराठा समाज शांत बसणार नाही. असे मत जिल्ह्याचे जेष्ठ नेते साहित्यिक दिनेशजी लव्हाट यांनी मांडले.
                 शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव व जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे यांच्या आमरण उपोषणाचा चौथ्या दिवशी ते बोलत होते. मी स्वतःच आरक्षणामुळे बाहेर आहे. अन्यथा मी मोठ्या पदावर नोकरी करत असतो. असे भावनिक मत मांडून त्यांनी मराठा युवकांना व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांस व साखळी उपोषणकर्त्यांचे भगवे वस्त्र व आई तुळजाभवानी प्रतिमा देऊन स्वागत केले व लढ्याला निश्‍चित यश येणार आहे. कारण हा लढा सर्वसामान्यांच्या वेदना घेऊन एक सामान्य निस्वार्थी माणूस म्हणून जरांगे पाटील लढत आहेत. यावेळी कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, प्रहारचे शेवगाव तालुका अध्यक्ष रामजी शिदोरे, शेतकरी बचाव जन आंदोलनाचे एकनाथ काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, जलभूमीचे बाळासाहेब जाधव, भायगावचे माजी सरपंच अशोक दुकळे, प्रहारचे तुकाराम शिंगटे, भगवान आढाव, पत्रकार शहाराम आगळे साखळी उपोषणा सहभागी आहेत.
       यावेळी भातकुडगावचे माजी सरपंच राजेश फटांगरे, बाबूलाल पटेल, काकासाहेब घुले, बाबासाहेब माळवदे, माऊली निमसे, मुसाभाई शेख,आत्माराम घुणे, रवींद्र लोंढे,अण्णासाहेब दुकळे, रमेश आढाव, सुधाकर लांडे, नवनाथ ढाकणे, डॉ. विजय खेडकर, योगेश खंबरे, नितीन खंडागळे, विजय नजन, सोपान खंबरे, डॉ. परवेज सय्यद,राजेश लोंढे, आप्पासाहेब फटांगरे, माऊली लोंढे,गणेश शिंदे, भाऊराव फटांगरे, देवदान वाघमारे, कानिफनाथ घाडगे, ज्ञानेश्‍वर गर्जे, बाबासाहेब साबळे, आदींनी पाठिंबा दिला आहे. यावेळी शेवगाव पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे रामदास गोल्हार, रासपचे जिल्हाध्यक्ष आत्माराम कुंडकर, ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे, वंचितचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण,एकनाथ कुसळकर, गणेश खंबरे, राजेंद्र शिंदे, महेश जाधव, विठ्ठलराव फटांगरे, चंदू फटांगरे, डॉ.शाम काळे, अशोक वाघमोडे, अनिल सुपेकर यांनी पाठिंबा दिला.

COMMENTS