Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बसच्या गर्दीत वकिलाचे पैशांचे पाकीट मारले

अहमदनगर/प्रतिनिधी ः लग्नासाठी पुणे येथे जाण्यास निघालेल्या वकिलाचे पाकीट पुणे बस स्थानकावर चोरीला गेले. या पाकिटात साडेसहा हजार रुपये रोख रक्कम व

संत निरंकारी मंडळाच्या वतीने 13 मे रोजीबाबा हरदेव सिंहजी यांच्या स्मृतीत ‘समर्पण दिवस’चे आयोजन
वित्त आयोग निधी अपहारप्रकरणी सरपंचासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Ahmednagar : अहमदनगर मधील सीना नदीला पूर वाहतूक ठप्प l LokNews24*

अहमदनगर/प्रतिनिधी ः लग्नासाठी पुणे येथे जाण्यास निघालेल्या वकिलाचे पाकीट पुणे बस स्थानकावर चोरीला गेले. या पाकिटात साडेसहा हजार रुपये रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रे होती. ही घटना 30 डिसेंबर रोजी दुपारी घडली असून या प्रकरणी 5 जानेवारी रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अब्दुलहमीद गुलाममुस्ताफ शेख (वय 71, रा. पांरशाखुंट, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. अ‍ॅड. शेख हे 30 डिसेंबर रोजी पुणे येथे लग्नास जाण्यासाठी पुणे बस स्थानकावर आले होते. बसमध्ये बसत असताना गर्दी होती. बसमध्ये गर्दी असल्याने त्यांना वाहकाने जागा नसल्याचे सांगितले. त्यामुळे शेख व त्यांच्या पत्नी बसमधून खाली उतरले. त्यानंतर फिर्यादी यांनी खिशातील पाकीट तपासले असता ते चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु त्यांना लग्नासाठी पुणे येथे जायचे असल्याने ते पुण्याला गेले. ते 4 जानेवारी रोजी नगरमध्ये आल्यानंतर त्यांनी 5 जानेवारी रोजी फिर्याद दिली आहे. पाकीट चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

COMMENTS