लालबागमध्ये जाऊन नांगरे पाटलांनी ठणकावलं

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लालबागमध्ये जाऊन नांगरे पाटलांनी ठणकावलं

नेता असो वा अभिनेता, घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही, लालबागमध्ये जाऊन नांगरे पाटलांनी ठणकावलंनेता असो वा अभिनेता, घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देण

कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात – अ‍ॅड.मनोहरराव देशमुख
सर्वात मोठ्या तुंगत ग्रामपंचायत मध्ये सत्ता परिवर्तन
आपण सर्वजण काही प्रमाणात मनोरुग्ण ः राजन खान

नेता असो वा अभिनेता, घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही, लालबागमध्ये जाऊन नांगरे पाटलांनी ठणकावलं
नेता असो वा अभिनेता, घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही, अशा शब्दात मुंबई पेलिस कायदा सुव्यस्था सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre Patil ) यांनी लालबागमध्ये जाऊन ठणकावलं. नांगरे पाटील यांनी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाशी चर्चा केली.

लालबागच्या राजाची स्थापना करणारे, स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांना पोलिसांनी नोटीस पाठवून त्यांची दुकानं बंद केलीत. त्यामुळे लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी प्रचंड नाराज आहेत. लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे बाहेरून कोणी भाविक लालबागमध्ये येणार नाही. मग स्थानिक रहिवाशांची दुकानं का बंद करण्यात आलीत, असा प्रश्न लालबाग मार्केटमधील रहिवाशी विचारत आहेत. यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवला.

दुकानं सुरु, पण गर्दी झाल्यास पुन्हा बंद
“दुकानात गर्दी होऊ शकते, त्यामुळे कोरोना संसर्गाला चालना मिळेल, त्यामुळे दुकानं बंद करण्यास सांगितलं होतं. पण आता केवळ दुकानाचा मालक आणि एक कामगार अशांना परवानगी दिली आहे. लालबागचा राजा परिसरात गर्दी होणार नाही याची काळजी मंडळाचे स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासन घेईल. दहा लोकांना आरतीसाठी परवानगी असेल, दहा जणांमध्ये कोण सेलिब्रिटी किंवा कोणी नेता असो त्याच्याशी पोलिसांचं देणं घेणं नाही, पण गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊ” असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष दर्शन, मुखदर्शन यांसाठी निर्बंध घातले आहेत. एका बाजूचे 46 आणि दुसरीकडील 47 दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

आरतीसाठी 10 लोकच असतील. मध्यममार्गानं प्रश्न सोडवला. दुकानांमध्ये 1+1 अशा दोन माणसांना परवानगी मिळेल. 144 च्या ऑर्डरमध्ये मॉडीफिकेशन केले आहे. आरतीसाठी 10 लोकांना परवानगी असेल, यात कोणी सेलिब्रिटी असतील, व्हीआयपी असतील की आणखी कोणी याबाबत पोलिसांना काही देणंघणं नाही, असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले.

लालबागच्या बाप्पाचं मुखदर्शन/प्रत्यक्ष दर्शन नसेल. केवळ ऑनलाईनच दर्शन घेता येईल. अशा सर्व चर्चेनंतर लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना थोड्याच वेळात होईल.

COMMENTS