महंत नरेंद्र गिरी आत्महत्या प्रकरणी शिष्याला ताब्यात घेतले

Homeताज्या बातम्यादेश

महंत नरेंद्र गिरी आत्महत्या प्रकरणी शिष्याला ताब्यात घेतले

लखनऊ : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांचे शिष्य आनंद गिरी यांना सोमवारी रात्री उत्तराखंडच्या हरिद

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात कुत्रे भगाव विशेष मोहीम
पनवेलमध्ये ज्वेलर्सच्या दुकानाला पाडले भगदाड !
विषारी दारुचे बळी

लखनऊ : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांचे शिष्य आनंद गिरी यांना सोमवारी रात्री उत्तराखंडच्या हरिद्वार येथून ताब्यात घेतले. महंत नरेंद्र गिरी यांनी मृत्यूपूर्वी लिहीलेले पत्र आणि रेकॉर्ड केलेला व्हिडीओ याधारे आनंद गिरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि निरंजनी आखाड्याचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी सोमवारी बाघंबरी मठात मृतावस्थेत आढळले होते. पोलिसांना घटनास्थळी महंत नरेंद्र गिरी यांनी मृत्यूपूर्वी लिहीलेली चिठ्ठी आणि रेकॉर्ड करून ठेवलेला व्हिडीओ यावरून त्यांनी सकृतदर्शनी आत्महत्या केल्याच वाटते असे मत प्रयागराजचे पोलिस अधीक्षक दिनेश कुमार यांनी सांगितले. महंत नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये काही लोकांचा उल्लेख असून त्यांच्याकडून त्रास झाल्याचे नमूद केलेय. “मी सन्मानाने जगलो असून अपमान सहन करत जगू शकत नाही. यामुळेच मी आत्महत्या करत आहे,” असं नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात ते आठ पानांच्या या सुसाईड नोटमध्ये नरेंद्र गिरी यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला असून यामुळेच आपण आयुष्य संपवत असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS