Homeताज्या बातम्या

कुंडलवाडी शहरात मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण अभियानाला वेग

 भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी दि. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत विशेष सखो

पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी विंधन विहीरचे खोदकाम; नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या वतीने हा उपक्रम
उष्णतेमुळे आजारांचा फैलाव; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन-वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश बोधनकर
कुंडलवाडीत कामगार दिन व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा



 भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी दि. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत विशेष सखोल पुनरीक्षण अभियान राबविण्यात येत असून,कुंडलवाडी शहरात या मोहिमेला वेग आला आहे.
या अभियानांतर्गत बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घराघरात जाऊन मतदारांची माहिती संकलित करत असून प्रत्येक मतदाराचा ईएफ फॉर्म भरून घेत आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे, माहिती व छायाचित्रे तयार ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अभियानादरम्यान प्रत्येक पात्र मतदाराचा ईएफ फॉर्म भरला जाणार असून त्यासाठी दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आवश्यक आहे. संबंधित मतदार अथवा कुटुंबातील प्रौढ सदस्याची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा फॉर्मवर घेण्यात येणार आहे. फॉर्मची एक प्रत मतदाराकडे राहणार असून दुसरी प्रत बीएलओकडे जमा केली जाणार आहे. तसेच 40 वर्षांवरील मतदारांनी सन 2002 च्या मतदार यादीतील स्वतःचा भाग क्रमांक व अनुक्रमांक उपलब्ध करून द्यावा. 40 वर्षांखालील मतदारांनी आई, वडील, आजी किंवा आजोबा यांपैकी कोणत्याही एका व्यक्तीचा सन 2002 च्या मतदार यादीतील भाग क्रमांक व अनुक्रमांक देणे आवश्यक आहे. विवाहित महिलांनी माहेरच्या कुटुंबाशी संबंधित माहिती अचूकपणे नमूद करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक सक्षम आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या विशेष मोहिमेत सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS