Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीराजची आयआयटी कानपूरमध्ये प्रशिक्षणासाठी निवड

कोपरगाव : येथील संजीवनी युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी श्रीराज वैभव गिरमे याची आयआयटी कानपूर येथे सायबर सुरक्षा अभ्यासक्रमासाठी अडीच महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या प्रशिक्षणासाठी देशभरातून एकूण २८३ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील केवळ तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यात कोपरगावच्या श्रीराज गिरमे याने स्थान मिळवत स्वतःबरोबरच संजीवनी युनिव्हर्सिटीचेही नाव उंचावले आहे. यावेळी बोलताना बिपीनदादा कोल्हे म्हणाले की, ग्रामीण भागात राहून श्रीराजने आयआयटी कानपूरसारख्या नामांकित संस्थेत सायबर सुरक्षा प्रशिक्षणासाठी पात्र ठरणे ही अभिमानाची बाब आहे. आजच्या काळात सायबर सुरक्षेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात प्रावीण्य मिळवणे गरजेचे आहे. श्रीराजचे केजीपासून ते बी.टेक (आयटी सायबर सिक्युरिटी)पर्यंतचे शिक्षण संजीवनी समूहातच झाले असून, त्याने या संधीचे चीज केले आहे. यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले, विलासराव माळी, बाळासाहेब वक्ते, निवृत्ती बनकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व संजीवनी उद्योग समूहातील पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी स्वागत केले, तर शेवटी संचालक निवृत्ती बनकर यांनी आभार मानले.

कोपरगाव मतदारसंघात नाला खोलीकरणाच्या कमाला वेग  
इन्स्टाग्रामवर पिस्टलचा फोटो; दोघांविरुद्ध गुन्हा; एआयच्या मदतीने बनावट फोटो तयार; कोपरगाव पोलिसांची कारवाई
डॉ. आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचे दीपस्तंभ : माजी आ. काळे

कोपरगाव : येथील संजीवनी युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी श्रीराज वैभव गिरमे याची आयआयटी कानपूर येथे सायबर सुरक्षा अभ्यासक्रमासाठी अडीच महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

या प्रशिक्षणासाठी देशभरातून एकूण २८३ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील केवळ तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यात कोपरगावच्या श्रीराज गिरमे याने स्थान मिळवत स्वतःबरोबरच संजीवनी युनिव्हर्सिटीचेही नाव उंचावले आहे.

यावेळी बोलताना बिपीनदादा कोल्हे म्हणाले की, ग्रामीण भागात राहून श्रीराजने आयआयटी कानपूरसारख्या नामांकित संस्थेत सायबर सुरक्षा प्रशिक्षणासाठी पात्र ठरणे ही अभिमानाची बाब आहे. आजच्या काळात सायबर सुरक्षेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात प्रावीण्य मिळवणे गरजेचे आहे. श्रीराजचे केजीपासून ते बी.टेक (आयटी सायबर सिक्युरिटी)पर्यंतचे शिक्षण संजीवनी समूहातच झाले असून, त्याने या संधीचे चीज केले आहे.

यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले, विलासराव माळी, बाळासाहेब वक्ते, निवृत्ती बनकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व संजीवनी उद्योग समूहातील पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी स्वागत केले, तर शेवटी संचालक निवृत्ती बनकर यांनी आभार मानले.

COMMENTS