Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.गणेश ढवळे यांना  श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 जाहीर

बीड प्रतिनिधी - दिव्य सेवा संस्थान,परळी तालुका पत्रकार संघ यांचे विद्यमाने देण्यात येणारा श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 सामाजिक कार्यकर्ते तथ

खर्डा येथे भव्य ईद मिलन कार्यक्रम उत्साहात
अवकाळी पावसाचा फटका, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती दोन दिवस राहणार बंद
निवडणूक जाहीर होण्याआधी पंतप्रधान मोदींच देशवासियांना खास पत्र

बीड प्रतिनिधी – दिव्य सेवा संस्थान,परळी तालुका पत्रकार संघ यांचे विद्यमाने देण्यात येणारा श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना जाहीर झाला असुन संयोजक पत्रकार दिपक वानखेडे व पत्रकार बालकिशनजी सोनी अध्यक्ष परळी तालुका पत्रकार संघ यांनी प्रमुख संपादकांच्या उपस्थितीत निवडपत्र देत जाहीर केले असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परळी वैजनाथ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत  पुरस्कार वितरण सोहळा होणार असुन श्रीफळ,सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
     दिवा सेवा संस्थान आणि परळी तालुका पत्रकार संघ यांच्या विद्यमाने किर्तीवंत, यशवंत, नामवंत, प्रतिभावंत, गुणवंत अशा महान रत्न व्यक्तीमत्वास ज्यांचे गतकार्य आदर्श घेण्यासारखे असुन त्यांच्या प्रमाणे पुढील पिढी घडावी व एक सुसंस्कृत समाजप्रिय नागरीक, सामाजिक कार्यकर्ता घडावा या उदात्त हेतूने समाजातील सर्व क्षेत्रातुन श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार समितीने समाजातील विचारवंत व नागरीकांशी चर्चा करून सर्वानुमते श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 साठी निवड केली असुन या गौरवमुर्तींचा गौरव सोहळा, श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 व शाल.श्रीफळ , सन्मान पत्र देऊन अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते व  उपस्थितीमध्ये मे 2023 मध्ये परळी वैजनाथ येथे भव्य दिव्य करण्यात येणार असुन पुरस्कार गौरव सोहळा व कुलस्वामिनी दिनदर्शिका 2023-24 ची तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरात लवकर सोहळ्याची तारीख घोषणा करण्यात येईल असे मुख्य संयोजक व पत्रकार दिपक वानखेडे व पत्रकार बालकिशन सोनी यांनी जाहीर केले आहे.

COMMENTS