बीड : बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागी राज्य नियंत्रण कक्षातून समीर शेख यां

बीड : बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागी राज्य नियंत्रण कक्षातून समीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या सुमारे साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात सचिन पांडकर यांनी बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. बीडमधील जाळपोळ, जातीय तणाव तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरण यांसारख्या संवेदनशील आणि गंभीर घटनांमध्ये त्यांनी ठाम भूमिका घेत कायद्याचा धाक कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकाळात पोलीस दलाचा एक आश्वासक आणि सक्रिय चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. बीड जिल्ह्यात प्रथमच इतका दीर्घकाळ पदभार सांभाळण्याची संधी त्यांना मिळाली होती. त्यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कोणाची नियुक्ती होणार याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू होती. अखेर राज्य नियंत्रण कक्षातून समीर शेख यांची बीडसाठी नियुक्ती निश्चित झाली असून, लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत.

COMMENTS