Homeक्रीडा

मराठवाडा क्रिकेट अकॅडमीच्या शाश्वत भुयारेची पुण्यात चमकदार कामगिरी; एमसीए निवड चाचणी सामन्यात गाजवले मैदान

नांदेड : येथील मराठवाडा क्रिकेट अकॅडमीचा १४ वर्षांखालील वयोगटातील खेळाडू तसेच किड्स किंग्डम पब्लिक स्कूल/श्री चैतन्य टेक्नो स्कूलचा विद्यार्थी शा

अल्पसंख्याक संरक्षण कायद्यासाठी संघर्ष समितीचा बीड जिल्हा दौरा यशस्वी; लवकरच राज्यव्यापी जनजागृती अभियान
मेजर नंदकुमार सैंदाणे यांची पीएसआय (PSI) पदी नियुक्ती
वृद्धांसाठी घरपोच ‘हयाती’ची नोंदणी; कर्जतमधील नगरसेविका नीता कचरे यांचा अनोखा उपक्रम
महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन - विकिपीडिया

नांदेड : येथील मराठवाडा क्रिकेट अकॅडमीचा १४ वर्षांखालील वयोगटातील खेळाडू तसेच किड्स किंग्डम पब्लिक स्कूल/श्री चैतन्य टेक्नो स्कूलचा विद्यार्थी शाश्वत सदाशिव भुयारे याने पुणे येथे सुरू असलेल्या ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या (MCA) १४ वर्षांखालील वयोगटाच्या निवड चाचणी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मावळ (पुणे) येथील इन्फिनिटी क्रिकेट ग्राउंडवर पारसी जिमखाना ‘ब’ संघाकडून खेळताना शाश्वतने पहिल्या डावात ९१ चेंडूंचा सामना करत ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ५२ धावांची खेळी केली. त्याच्या या संयमी फलंदाजीमुळे संघाला भक्कम धावसंख्या उभारता आली. त्यानंतर दुसऱ्या डावातही शाश्वतने ३६ चेंडूंमध्ये ३ चौकारांसह २० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याच्या दोन्ही डावांतील उत्कृष्ट योगदानामुळे पारसी जिमखाना ‘ब’ संघाने पारसी जिमखाना ‘अ’ संघावर निर्णायक विजय मिळवला.

शाश्वत भुयारे याच्या या उत्कृष्ट यशाबद्दल मराठवाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. सदाशिव भुयारे, मराठवाडा क्रिकेट अकॅडमीचे संचालक माधव भुयारे, लेडीज फिटनेस क्लबच्या संचालिका मोनिका नांदेडकर, अकॅडमीचे सर्व प्रशिक्षक तसेच किड्स किंग्डम पब्लिक स्कूल आणि श्री चैतन्य टेक्नो स्कूल (खुरगाव) येथील प्राचार्य व शिक्षकवृंदाने त्याचे कौतुक करून भावी क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS