Homeताज्या बातम्या

मेजर नंदकुमार सैंदाणे यांची पीएसआय (PSI) पदी नियुक्ती

श्रीरामपूर : येथील बोरावकेनगर मधील मेजर नंदकुमार संतराम सैंदाणे यांची केंद्रीय पोलीस दलामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर (PSI) म्हणून श्रीनगर येथे नियु

ठाणेदार होताच औटे यांचा ‘सिंघम’ अवतार; भोकरमध्ये अवैध दारू व मटका व्यवसायावर धडक कारवाई, ५ आरोपींवर गुन्हे दाखल
साकत घाटात भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; २० जण जखमी, चौघे गंभीर
नांदेडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ‘निवडक’ भेटींची जोरदार चर्चा; लोकप्रतिनिधींना डावलून गुत्तेदारांशीच जवळीक?

श्रीरामपूर : येथील बोरावकेनगर मधील मेजर नंदकुमार संतराम सैंदाणे यांची केंद्रीय पोलीस दलामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर (PSI) म्हणून श्रीनगर येथे नियुक्ती झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मेजर नंदकुमार सैंदाणे हे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत (SSC) स्पर्धा परीक्षा देऊन, पुणे येथील कठीण प्रशिक्षणानंतर त्यांची पीएसआय पदी निवड झाली. राहुरी तालुक्यातील मांजरी गावचे सुपुत्र असलेले मेजर नंदकुमार सैंदाणे यांनी २००४ ते २०२० या काळात भारतीय आर्मीमध्ये कम्युनिकेशन अधिकारी म्हणून श्रीनगर, मथुरा, जबलपूर, मणिपूर आदी ठिकाणी आर्मी ऑफिसर म्हणून सेवा बजावली.

मेजर नंदकुमार सैंदाणे यांनी सेवानिवृत्तीनंतर बंधू रवींद्र सैंदाणे यांच्याबरोबर प्रभावी शेतीकाम केले. मांजरी ग्रामस्थ, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी त्यांचा सन्मान केला. तसेच बोरावकेनगर अक्षरवेधमधील श्रीराम अबॅकस क्लासमध्ये प्रमुख संचालक प्रा. सौ. पल्लवी नंदकुमार सैंदाणे व पालक, विद्यार्थ्यांनी मेजर नंदकुमार सैंदाणे यांचा यथोचित सत्कार केला. श्रीरामपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबूराव उपाध्ये यांचे ते जावई असून त्यांचा वाचन संस्कृतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. मेजर नंदकुमार सैंदाणे यांचे तुळे कुंभारकला केंद्राचे प्रमुख प्रा. विलासराव तुळे, श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानचे सचिव नितीन जोधळेकर, महानुभाव पंथ मंचचे साधक संजय कारभारी उपाध्ये आदींनी अभिनंदन व सत्कार केला.

COMMENTS