Homeताज्या बातम्या

अध्यात्मिक वारसा जतनासाठी ’श्री राहेरक्षेत्र महात्म्य’ पुस्तकाला आर्थिक बळ; कॅप्टन आशिष दामले यांच्याकडून ५० हजारांची मदत

नायगाव : राहेरक्षेत्राच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा ठेवा जतन करण्यासाठी आणि पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रकाशित करण्यात येत

मालेगावात जियो नेटवर्कची गंभीर समस्या; ग्राहक त्रस्त
खासदारांचा फोन जाताच गुत्तेदार लाईनवर; रखडलेला रस्ताचे काम सुरू
माष्टी येथे शांतता व सामाजिक सलोखा बैठक संपन्न

नायगाव : राहेरक्षेत्राच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा ठेवा जतन करण्यासाठी आणि पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रकाशित करण्यात येत असलेल्या ’श्री राहेरक्षेत्र महात्म्य’ या पुस्तकासाठी आर्थिक मदत जाहीर झाली आहे. ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे’ अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) कॅप्टन आशिष दामले यांच्या पुढाकारातून या पुस्तकाच्या प्रकाशन व प्रसारासाठी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

नृसिंह मंदिर देवस्थान समितीचे विश्वस्त संतोष जोशी आणि धनंजय देशमुख यांना ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे’ प्रदेशाध्यक्ष निखिलभाऊ लातूरकर यांच्या हस्ते ५० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. राहेरक्षेत्र येथे सात दिवसांपासून सुरू असलेल्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या सांगता समारोपानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात हा मदतनिधी सुपूर्द करण्यात आला.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पूनमताई पवार, भागवताचार्य मंदारबुवा रामदासी, अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे येवतीकर, बाळासाहेब पांडे मांजरमकर, संतोष कुलकर्णी, बंडूपंत कुंटूरकर उपस्थित होते. यावेळी बोलताना निखिलभाऊ लातूरकर यांनी सांगितले की, परशुराम आर्थिक विकास महामंडळामार्फत धार्मिक व सामाजिक उपक्रमांना सातत्याने पाठबळ दिले जात असून, नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत विविध विधायक कामांसाठी सुमारे ७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ’श्री राहेरक्षेत्र महात्म्य’ हे पुस्तक राहेरक्षेत्राचा इतिहास व परंपरा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे महत्त्वाचे दस्तावेज ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

COMMENTS