उद्धव ठाकरे हे देशाचे नेते… नेतृत्व करण्याचीही क्षमता… राऊतांची स्तुतीसुमने…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरे हे देशाचे नेते… नेतृत्व करण्याचीही क्षमता… राऊतांची स्तुतीसुमने…

प्रतिनिधी : मुंबईमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपोआप देशाचा नेता होत असतो. आणि ही क्षमता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये असल्याचा दावा केल

राज्यात दहीहंडीला परवानगी नाहीच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाकाळात आरोग्य मंदिरं उघडल्याबद्दल जनता आशिर्वाद देईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
चिपी विमानतळाच भूमिपूजन भाजपच्या काळात झालं… शिवसेनेचा काय संबंध?

प्रतिनिधी : मुंबई
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपोआप देशाचा नेता होत असतो. आणि ही क्षमता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये असल्याचा दावा केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

नजीकच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवर काम करू शकतात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे यांच्यात राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता आहे

आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपोआप देशाचा नेता होत असतो, असं त्यांनी नमूद करत संकेतही दिले. तसेच शेतकर्‍यांच्या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोबाडीत मारली तरी कोणी सत्ता सोडून जाणार नाही, असं मला एका कॅबिनेट मंत्र्याने सांगितल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापूर येथे केला होता.

त्यावर बोलताना राऊत म्हणाले, एक मंत्री कोण? असा हवेत गोळीबार करून काहीही साध्य होणार नाही. आणि कोणी कुणाच्या थोबाडीत मारण्याची गरज नाही. चंद्रकांत पाटील किंवा अन्य कुणी अशा अफवा पसरवतात. त्यातच त्यांना आनंद मिळतो.

त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. पण महाविकास आघाडीचं सरकार तीन वर्षे चालेल. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. त्याबाबत त्यांनी आश्वस्त असावे, असा टोला राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

COMMENTS