Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड-पाटण मार्गावर स्कॉपिओ-टेम्पो धडक; स्कॉपिओ चालक गंभीर

कराड / कराड- पाटण मार्गावर असलेल्या विहे गावच्या हद्दीत स्कॉर्पिओ आणि एका टेम्पोचा मोठा अपघात झाला आहे. या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून

अरे ला कारे करत जाब विचारा : रुपालीताई चाकणकर
Osmanabad: मांजरा नदी मध्ये 17 जण अडकले
कराड विकास सोसायटीत काँग्रेस-राष्ट्रवादीत होणार टक्कर; संचालक मंडळात कोण मंत्री की मंत्री पुत्र?

कराड / कराड- पाटण मार्गावर असलेल्या विहे गावच्या हद्दीत स्कॉर्पिओ आणि एका टेम्पोचा मोठा अपघात झाला आहे. या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून स्कॉर्पिओ चालक गंभीर जखमी झाला आहे. तर टेम्पो पलटी तर स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला असून सदरची घटना गुरूवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातात जखमी स्कॉर्पिओ चालकाचे अमित हिंदुराव शिंदे (रा. पाटण, ता. पाटण) असे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली व मल्हारपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड-पाटण मार्गावर कराड बाजूला दुपारी हा अपघात झाला. अपघात मोठ्या वाहनांचा झालेला असून यावेळी समोरासमोर झालेल्या धडकेमुळे मोठा आवाज झाला. स्कॉर्पिओ गाडीचे (क्रमांक एमएच 42 एच 9241) पुढील बाजूचा चक्काचूर झाला आहे. तर टेम्पोचेही (एमएच 09 एल 5946) मोठे नुकसान झाले आहे.
विहे गावच्या हद्दीत व कराड आणि पाटण तालुक्याच्या हद्दीवर हा अपघात झाला. जखमीला कराड येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मल्हारपेठ येथील पोलीस कॉन्स्टेबल वैभव पवार, हेड कॉ. नानासो कांबळे, संभाजी जाधव यांनी घटनास्थळी धाव घेवून मदत केली. तसेच कराड-पाटण मार्गावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

COMMENTS