Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चासनळी व परिसरातील भाविकांची नर्मदा परिक्रमा उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील चासनळी व परिसरातील महिला व पुरुष भाविकांनी एकत्र येत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली त्यांनी आणलेल्या पवित्र नर्मदेच्य

मारुती व्हॅनसह शितपेय चोरणारे 12 तासात मुद्देमालासह जेरंबद 
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या 11 विद्यार्थ्यांना साहेबच खुशबू स्कॉलरशिप जाहीर
दरोडा टाकण्याच्या तयारीतील आरोपींना हत्यारासह पकडले

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील चासनळी व परिसरातील महिला व पुरुष भाविकांनी एकत्र येत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली त्यांनी आणलेल्या पवित्र नर्मदेच्या जलाचे पूजन सामूहिक हनुमान मंदिरात करण्यात आले. माणसाने जीवनात एकदा तरी नर्मदा परिक्रमा पूर्ण करावी नर्मदा परिक्रमा पूर्ण करताना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नर्मदा मैया दर्शन देते असे म्हटले जाते, सर्व परिक्रमा पूर्ण करणार्‍या भाविक भक्तांनी नर्मदा च्या पाण्याचा पूजनाचा सामूहिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला होता.
यावेळी परिसरातील भाविक उपस्थित होते नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे  सुभाषराव गाडे त्यांच्या सहकार्‍यांचा स पत्नीक सत्कार करण्यात आला त्यावेळी परिसरातील महिलांनी कलश घेऊन  गावभर मिरवणूक काढली याप्रसंगी नर्मदेच्या जलाची व गोदावरीच्या जलाची भेट घडवून आणण्यात आली यावेळी श्री गाडे म्हणाले की नर्मदा परिक्रमेचा आनंद काही वेगळा असून भारतातील सर्व नद्या दक्षिणेकडे वाहतात मात्र नर्मदा ही एकमेव पश्‍चिम वाहिनी असून परिक्रमात पूर्ण केल्यानंतर मनःशांती मिळते नर्मदेच्या जलाच्या दर्शनाचा भाविकांनी यावेळी लाभ घेतला  परिक्रमा पूर्ण करणारे  सुभाषराव गाडे. ज्ञानदेव मांजरे, पंडितराव चांदगुडे चांगदेव तिडके. निर्मला गाडे. हिराबाई शेवाळे. मंदाबाई चांदगुडे. निर्मला तिडके. सिंधुबाई कुंभारकर, हिराबाई चांदगुडे हिराबाई चव्हाणके. श्रीमती शकुंतला जाधव आदी भाविकांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली यावेळी सर्व परिक्रमा करणार्‍यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते त्याचा सर्वांनी लाभ घेतला. याप्रसंगी अनिल गाडे, नारायणराव मांजरे, वसंतराव दंडवते, अशोकराव आहेर, प्रकाश गाडे चंद्रशेखर चांदगुडे आदी उपस्थित होते  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन नथू शेवाळे यांनी केले.

COMMENTS