Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमोल किर्तीकर यांना दुसऱ्यांदा ईडीचे समन्स

 मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभेसाठी वायव्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीक

ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स
खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकरांची चौकशी
अमोल किर्तीकरांना ईडीचे दुसरे समन्स

 मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभेसाठी वायव्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना ईडीनं  दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. ईडीनं समन्स पाठवून 8 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अमोल किर्तीकरांना दिले आहेत. दरम्यान, कोरोना काळातील खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी किर्तिकर यांना समन्स बजावण्यात आलं आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेनंही त्यांची याप्रकरणात चौकशी केली होती. काही दिवसांपूर्वी युवासेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे गटाचे आणखी एक नेते ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत. अमोल किर्तीकरांना ईडीनं धाडलेलं हे दुसरं समन्स आहे. गेल्या चौकशीला अमोल किर्तीकर चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे कीर्तिकर गैरहजर असल्याची माहिती त्यावेळी वकील दिलीप साटलेंनी दिली होती. ईडीनं अत्यंत शॉर्ट नोटीस देउन समन्स दिल्यानं, हजर होण्यात अडचण होत असल्याचं कीर्तीकरांनी पत्रात नमूद केलं होतं. तसेच, वकिलांकडून पत्र देऊन कीर्तीकर हजर राहण्यासाठी मुदतवाढ मागितल्याचं वकीलांनी सांगितलं होतं. 

अमोल गजानन किर्तीकर म्हणजे, शिवसेनेचे आणि सध्या शिंदे गटात असलेले खासदार. अमोल यांनी आपला राजकीय प्रवास आदित्य ठाकरेंच्या युवासेनेतून सुरू केला. सध्या अमोल कीर्तीकर ठाकरे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकरांना लोकसभेसाठी वायव्य मुंबईतून तिकीट देण्यात आलं आहे. 

COMMENTS