Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंबा साखर कारखाना येथे तपासणी शिबिर संपन्न

सुरक्षा हिच आरोग्याची हमी-_सुकेशिनी गंडले

अबांजोगाई प्रतिनिधी - दिनांक 21 ऑगस्ट रोजी  व्यकंटेश्वरा इंडस्ट्रिअल सर्व्हिसेस प्रा लि.    आंबा साखर कारखाना येथे  कामगार,अधिकारी,कर्मचारी यांच

ओबीसी आरक्षणावर नवीन बिल आणणार ; अजित पवार | LOKNews24
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना कोरोनाची लागण
चिदम्बरम – फडणवीस सांस्कृतिक ऐक्य!

अबांजोगाई प्रतिनिधी – दिनांक 21 ऑगस्ट रोजी  व्यकंटेश्वरा इंडस्ट्रिअल सर्व्हिसेस प्रा लि.    आंबा साखर कारखाना येथे  कामगार,अधिकारी,कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
मा. जिल्हाधिकारी, बीड यांच्या संदर्भ पत्र आदेशानुसार, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आयसिटीसी अंबाजोगाई आणि व्यकंटेश्वरा इंडस्ट्रियल प्रा. लि.अबांसाखर कारखाना, वाघाळा आणि ग्रामीण विकास मंडळ यांच्या सहकार्याने आज सदरील साखर कारखान्यातील कर्मचारीवृंदा करिता कखत/-खऊड, ढइ, डढख मार्गदर्शन आणि एचआयव्ही चाचणी शिबीर संपन्न झाले.   सदरील कार्यक्रमात समुपदेशक सुकेशनी गंडले यांनी एड्स आणि एचआयव्ही संबंधी सखोल मार्गदर्शन केले. लैंगिक आजार संबंधी श्री सुनील गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात  सर्व कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. श्री विश्वास लवंद आणि राजेश गोस्वामी  प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित होते.या शिबिरामध्ये बावन विविध तपासण्या करण्यात आल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले प्रस्ताविकामध्ये कारखान्याचे जनरल व्यवस्थापक सुशील पाटील   यांनी असे सांगितले की,कामगारांच्या कल्याणासाठी तसेच आरोग्यासाठी सतत असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यामध्ये आपण व आपली टीम अग्रेसर असते आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी सूचित केल्याप्रमाणे इथून पुढेही आपण वेळोवेळी कामगार व सर्व कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या तपासणीचे शिबिर आयोजित करून यासाठी उपस्थित सर्व विभागाचे व टीमचे त्यांनी आभार व्यक्त केले. आयसीटीसी विभागाच्या समुपदेशक सुकेशीनी गंडले मॅडम यांनी एचआयव्ही एड्स वरील माहिती सांगताना लोकांना हा आजार कसा होतो याची चार कारणे-संक्रमित सुई, संक्रमित रक्त,संसर्गित आईपासून  होणार्‍या बाळाला, असुरक्षित लैंगिक संबंध अशी कारणे सांगितली,मुख्य चार कारणाशिवाय इतर सर्व समाजात असणारी गैरसमज ही सांगितले, तपासणी केल्याने लवकर निदान झाले तर लवकर उपचार करता येतात. एआरटी चा उपचार सुरू केल्यानंतर रुग्ण सामान्यपणे जीवन जगू शकतो नियमित उपचार केल्याने विषाणु वर नियंत्रण राहते.  हा आजार भिण्यासारखा नाही परंतु लपवल्याने  त्याची तीव्रता वाढू शकते.
  शैलेंद्र देशपांडे साहेब यांनी टीबी विषयी माहिती सांगताना सांगितले की टीबी तपासण्याची अद्यावत यंत्र साहित्य सरकारी दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहेत केस आणि नखं सोडली तर इतर शरीरातील सर्वच अवयवांना टीबीचा संसर्ग होऊ शकतो टीबीला पण भिण्यासारखे कारण नाही वेळेत उपचार घेतल्यानंतर टीबी पण बरा होतो. टीबी मध्ये लाखो रुपयाला मिळणारी मेडिसिन मोफत दिली जातात. टीबी विषयीची लक्षणे सांगून उपचार सांगण्यात आले.  सुनील गायकवाड समुपदेशक गुप्तरोग विभाग यांनी उपस्थितांना गुप्तरोग विषयी माहिती सांगताना असे सांगितले की,आपल्या गुप्ता अंगावर होणारा आजार असून त्याची लक्षणे सांगितली, ती लपवून ठेवू नका.सरकारी दवाखान्यांमध्ये सर्व उपचार मोफत आहेत गुप्तरोग हे लपवून ठेवल्याने वाढतो. बापु लुंगेकर प्रकल्प व्यवस्थापक प्रतिबंध विभाग  यांनी  मनोगत व्यक्त करताना उपस्थितांना असे सांगितले की, इथे विविध आजारावर मिळालेली माहिती आपण नेहमी लक्षात ठेवावी तसेच आपल्या मित्र व परिवार जनांनाही या रोगाबाबत जागृत करावे हा अश्या शिबिरांचा मुख्य उद्देश असतो आजारापेक्षा समाजामध्ये गैरसमज जास्त फसरवले जातात  आणि गैरसमज मधूनच भीतीचे वातावरण निर्माण होऊन रुग्णाची मानसिक स्थिती खचली जाते  कुठल्याही रुग्णांसोबत कलंक आणि भेदभाव करू नये. काही मनात आणखी शंका असतील तर सरकारी दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन करून  श्री.सुशील पाटील व कारखाना व्यवस्थापनाचे  आभार व्यक्त केले तपासणी शिबिरामध्ये वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेश गोस्वामी, विश्वास लवंद, कॅम्प समन्वयक  प्रद्युम्न  पाथरकर,  प्रयोगशाळा तंत्रज्ञ सैफ खुरेशी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रोहीत वंजारे, कपील कांबळे,विविध तपासणी विभाग सिविल बिड बोंधर विश्वजीत तसेच ग्रा. वि. मं. व्यवस्थापक सय्यद फारूक, समुपदेशक भिमा कांबळे, विनोद वाघमारे,रेखा घाटे, पांचाळ  किस्कींदा, सरिता सुरवसे, सुरेश काळुंखे,अक्षय रामधामी यांची उपस्थिती होती.

COMMENTS