Sangamner : संगमनेर शहरातील डोंबिवली बँकेला लागली आग (Video)

Homeअहमदनगर

Sangamner : संगमनेर शहरातील डोंबिवली बँकेला लागली आग (Video)

संगमनेर शहरातील सह्याद्री कोलेजसमोर असलेल्या डोंबिवली बँकेच्या शाखेमधून आज रविवारी दुपारी बारा वाजता अचानक धूर बाहेर निघू लागला. त्यामुळे नागरिकांची

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकारण तापले
एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
आनंदऋषीजी महाराज प्रतिमेची पालखी मिरवणूक

संगमनेर शहरातील सह्याद्री कोलेजसमोर असलेल्या डोंबिवली बँकेच्या शाखेमधून आज रविवारी दुपारी बारा वाजता अचानक धूर बाहेर निघू लागला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. त्यानंतर अग्निशमन दलाला याबाबत सांगितले असता अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचले. परंतु आज रविवार दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी बँकेला सुट्टी होती. त्यामुळे येथील अधिकारी व कर्मचारी नव्हते. बँकेचे शटर उघडल्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले होते.अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. परंतु या आगीमध्ये बँकेतील फर्निचर जळून खाक झाले आहे. बँकेच्या अधिकारी बाहेरगावी गेल्यामुळे ते आल्यानंतरच ही आग कशामुळे लागली याबाबत खुलासा होणार आहे.

COMMENTS