Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उंदीर, खेकड्यांचा कारनामा 17 कोटींना

पुणे प्रतिनिधी - पाटबंधारे विभागाचा नवीन उजवा मुठा कालवा 2019 मध्ये फूटून जनता वसाहत परिसरात मोठे नुकसान झाले होते. हा कालवा उंदीर, घुशी आणि खेकड

माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे वृद्धापकाळाने 90 व्या वर्षी निधन
सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचे निधन
सीएम केअर फंडाचा अभिमानच! पीएम केअर चे काय…?

पुणे प्रतिनिधी – पाटबंधारे विभागाचा नवीन उजवा मुठा कालवा 2019 मध्ये फूटून जनता वसाहत परिसरात मोठे नुकसान झाले होते. हा कालवा उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे फुटल्याचा निष्कर्ष पाटबंधारे विभागाने काढला होता. मात्र, हे भगदाड महापालिकेला तब्बल 17 कोटी रुपयांना पडले आहे.


भगदाड पडलेल्या कालव्याची भिंत उभारली असली तरी आसपासच्या भागात कालवा दुरुस्त करणे आवश्यक असल्याने हे पैसे महापालिकेने देण्याची मागणी पाटबंधारे विभागाने केली होती. तसेच हे पैसे महापालिका देत नसल्याने हडपसर येथे उभारण्यात आलेल्या समान पाणी योजनेच्या टाक्यांसाठी पाटबंधारे विभागाच्या हद्दीतून जलवाहिनी टाकण्यास महापालिकेस परवानगी दिली जात नव्हती. मात्र, अखेर महापालिका हे पैसे देण्यास तयार झाली आहे. महापालिकेच्या पाणी वापराबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत हडपसर परिसराच्या पाण्याबाबत आमदार चेतन तुपे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नातून ही बाब समोर आली आहे. हडपसर भागाला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने समान पाणी योजनेत पाच टाक्या उभारल्या आहेत. मात्र, या टाक्यांमध्ये पाणी सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या जलवाहिन्या रामटेकडी टाकीवरून अद्याप जोडलेल्या नाहीत. या जलवाहिन्या पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या जागेतून जातात. त्यामुळे त्यासाठी पाटबंधारे विभागाची परवानगी आवश्यक आहे. महापालिकेने त्यासाठी दोन वर्षे पत्रव्यवहार केला आहे. मात्र कालवा फुटीचे 17 कोटी द्यावेत, तरच परवानगी देण्याची भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे. त्यामुळे या टाक्या पूर्ण असूनही पाणी मिळत नसल्याचे तुपे यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. तसेच पालकमंत्री पाटील यांनी पालिकेच्या 17 कोटींच्या निधीची हमी पाटबंधारे विभागाला देऊन तातडीने काम करण्याची परवानगी देण्यासाठी सूचना द्याव्यात, अशी मागणी केली. त्यावेळी महापालिकेने हे पैसे देण्यासाठी स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवून लवकरात लवकर निधी दिला जाईल, असे सांगितले आहे.

COMMENTS