मंगल दत्त क्षेत्रात आत्मिक समाधान मिळते- आ अरुण काका जगताप 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंगल दत्त क्षेत्रात आत्मिक समाधान मिळते- आ अरुण काका जगताप 

मंगल दत्त क्षेत्रात शंकर महाराज प्रकटदीन सोहळा उत्साहात संपन्न

अहमदनगर प्रतिनिधी - मंगल दत्त क्षेत्रात आल्यावर आत्मिक समाधान मिळते,येथील स्वच्छता,प्रसन्न व आध्यत्मिक वातावरण खुप चांगले असल्याने आत्मिक समाधान मिळत

काँग्रेसचे मुक्कामी आंदोलन आश्‍वासनानंतर स्थगित ; आंदोलकांवर गुन्हा दाखल, मनपा ऑक्सिजन बेड सुविधा करणार
निलंबनातून शिक्षकांची हानी मात्र प्रशासनाची चांदी
तुम्ही कशासाठी बाहेर पडला आहात ; भोसले-पाटील यांच्याकडून नागरिकांना विचारणा

अहमदनगर प्रतिनिधी – मंगल दत्त क्षेत्रात आल्यावर आत्मिक समाधान मिळते,येथील स्वच्छता,प्रसन्न व आध्यत्मिक वातावरण खुप चांगले असल्याने आत्मिक समाधान मिळते,आम्ही बाहेरगावी गेल्यावर भेटलेली लोक या स्थानबाबाबत आम्ही येथे येतो असे सांगतात असे प्रतिपादन आ अरुण काका जगताप(Arun kaka Jagtap) यांनी केले. नगर मधील मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने एमआयडीसीच्या मंगल दत्त क्षेत्रात  शंकर महाराज प्रकटदीन उत्सव मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला यावेळी ते बोलत होते त्याच्या हस्ते महाआरती व पालखीचा शुभारंभ करण्यात आला ते पुढे म्हणाले अनेक कार्यकर्ते पहिले जे जीवनात हरले होते ते या पुरातन क्षेत्रात शंकर महाराजांचे अनुयायी राजाभाऊ कोठारी यांच्याकडे आले व आज स्वतःचा चांगला उद्योग व्यवसाय करत आहेत हे क्षेत्र म्हणजे जणू नापासांची शाळा आहे जे जीवनात नापास झाले आहेत ते येथे येऊन पास झाले आहे हे मी स्वतः पाहिलेले आहे 

               अनेक वर्षानंतर येथे आलॊ तरी ३७ वर्षांपासून मंगलभक्त सेवा मंडळ सामाजिक काम करत आहे अनेक विद्यार्थ्यांना मदत,गोरगरिबांना वैद्यकीय सेवा,तसेच अन्नदान ते करतात त्यांचे सर्व अनुयायी हे आज निस्वार्थ भावनेने काम करतात म्हणून राज्यात नव्हे तर देशात हे स्थान प्रसिद्ध झाले आहे असेही ते म्हणाले .  शंकर महाराज प्रकटदीन निम्मित राजाभाऊ कोठारी हस्ते सकाळी अभिषेक करण्यात आला तर असंख्य भाविकांनी शंकरगीता सामूहिक पारायण केले, दुपारी आ जगताप यांच्या हस्ते श्रीची महाआरती,पाळणा व जन्मोत्सव करण्यात येऊन पालखी मिरवणूक परिसरात काढण्यात आली नंतर दर्शन सोहळा,भजन तसेच महाप्रसाद संपन्न होणार झाला कार्यक्रमासाठी शहरांसह राज्यातून भाविक,भक्त मोठ्या संख्येने भाविक आले होते  सकाळपासून ते रात्रीपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी होती                         श्री शंकर महाराज योगीराज होते, याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे.ते स्वत: मात्र नेहमी म्हणत, ‘सिद्धीच्या मागे लागू नका!’ पण त्यांनी आपले योगसामर्थ्य कळत-नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले. श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष.त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. काहींना ‘सिद्धी’ हवी असते ती ‘प्रसिद्धी’साठी! त्याने नावलौकिक वाढतो, धन-दौलत मिळते, शिष्य-परिवार वाढतो! म्हणून श्री शंकर महाराज म्हणत ‘सिद्धीच्या मागे लागू नये’ त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी धन-दौलत, नावलौकिक वा शिष्य-परिवारादि उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत. ते स्वत: खऱ्या अर्थाने सिद्धींच्या मागे लागले नाहीत. पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होत, हे चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते. आचार्य अत्रे, न्यायरत्न विनोद यांच्यासारखे प्रकांड पंडित शंकर महाराजांना मानीत. हे विद्वान त्यांची योग्यता जाणून होते. ते म्हणत, ‘मला जाती, धर्म काही नाही. ते स्वत: खरोखरीच सर्वांशी समभावाने वागत. त्यामुळे त्यांच्याकडे मुसलमानही येत. एका मुसलमानाने त्यांना आपली काही अडचण सांगितली. शंकर महाराजांनी त्यांना काय सांगावे? ‘अरे, तू नमाज पढत नाहीस. नमाज पढत जा.तुझी अडचण दूर होईल.’ ते काय शिकले होते कुणास ठाऊक! पण काही दीड शहाण्या विद्वानांना त्यांनी अस्खलित इंग्रजीतून उत्तरे दिली. त्यांना इंग्रजीचे ज्ञान कसे नि कुठे झाले, कुणास ठाऊक!

                   श्री शंकर महाराजांची अतिशय साधी शिकवण आहे श्री शंकर महाराजांनी मोठमोठी व्याख्याने, प्रवचने केली नाहीत. एखाद्या ग्रंथावर टीका लिहिली नाही. आलेल्या व्यक्तींना त्यांचे साधेसुधे मार्गदर्शन असे-ते म्हणत, ‘अरे! आचरण महत्त्वाचे! ग्रंथांचे वाचन नि अभ्यास आचरणात येईल तेवढाच खरा!ते म्हणत, ‘भावनेने भिजलेले असेल, ते भजन!’त्यांनी अनेकांना सांगितले, ‘माता-पित्याची सेवा करा. कुलदेवतेची आराधना करा. यापेक्षा अधिक काही नको.’ श्री सद्गुरु शंकर महाराज हे उंचीने फार कमी आणि जन्मतः अष्टावक्र व आजानुबाहू होते. त्यांचा उत्साह हा वाखाणण्यासारखा असे. नेहेमी सफेद धोती आणि सफेद शर्ट परिधान करून असत. खूप वाढलेले केस, दाढी मिशी आणि त्यातून डोकांवणारे अतिशय मोठे पण भेदक डोळे. प्रथमदर्शनी महाराजांचे वागणे एखादया लहान मुलाप्रमाणे वाटे. पण त्यांचे तेज आणि योग सामर्थ्य त्यांच्या चेहेऱ्यावरून ओतप्रोत ओसंडे. लहान मुलांप्रमाणे वागणारे आणि स्वतःला अज्ञानी आणि गांवढळ संबोधणारे.  महाराज जेव्हा बोलत तेव्हा मात्र भल्याभल्यांची तोंड बंद होत असत. स्वतःला अशिक्षित म्हणवणारे महाराजांचे जवळजवळ सर्वच भाषांवर प्रभुत्व होते. आलेल्या भक्ताच्या मायबोलीत ते त्याला उत्तर देत. त्यांचे हे प्रभुत्व फक्त भारतीय भाषेवरच नाही तर परदेशी भाषांवरपण होते,आलेल्या रशियन दांपत्याशी महाराजांनी अस्खलीत रशियन भाषेत संवाद साधला होता. हे न सुटलेले कोडे आहे. भगवंतच तो त्याला काय अशक्य! अक्कलकोट स्वामी समर्थांना शंकर महाराज आपले गुरु असे संबोधीत. एक आख्याईका इकडे नमूद करावीशी वाटते.

COMMENTS