Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत किसन बाबाची सोन्याची श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी शांतीचे विद्यापीठ..

बीड प्रतिनिधी - आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा । मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य ॥मच्छिंद्रानी बोध गोरक्षाशी केला॥ गोरक्ष ओळला गहिनीप्रती ॥या गुरुपरंपरेती

थ्री इडियट्स’ चा सिक्वेल येणार ?
दहिवडी पोलिसांचा मार्डी येथे छापा; 9 लाखाचा गांजा जप्त
तंत्रशिक्षणाबरोबर व्यवस्थापन शिक्षणात देखील आरआयटी अग्रेसर : डॉ. सुषमा कुलकर्णी

बीड प्रतिनिधी – आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा । मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य ॥
मच्छिंद्रानी बोध गोरक्षाशी केला॥ गोरक्ष ओळला गहिनीप्रती ॥
या गुरुपरंपरेतील अभंगाप्रमाणे.. भारत देशाच्या अध्यात्मिक श्रीमंती मध्ये नाथपरंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.वारकरी संप्रदायाचां उगम हा देखिल नाथ परंपरेत पहायला मिळतो.
याच नाथपरंपरेतील मच्छिंद्रनाथाचे पट शिष्य गोरक्षनाथांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले पवित्र ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी.. बीड पासुन पूर्वेस 20 किलोमीटर अंतरावर बालाघाटाच्या डोंगर रांगेत निसर्ग सौंदर्याने नटलेली हीच ती गोरक्षनाथ टेकडी..जिचा उल्लेख नवनाथ ग्रंथामध्ये गर्भगिरी पर्वत म्हणून केला जातो. याचं ठिकाणीं गोरक्षनाथांनी प्रवास करतांना गुरूंच्या झोळीतील सोन्याची वीट फेकली.अशि अख्याईका आहे.गोरक्षनाथांनी तप केल्याचा उल्लेख नवनाथ देखिल आढळतो.त्यामूळे सिद्ध साधकाची पवित्रभूमी म्हणुन गोरक्षनाथ टेकडीचे विशेष महत्व आहे. सद्गुरु किसन बाबा यांच्या पुण्यतिथी 25 रोप्य महोत्सव निमित्त हा लेख प्रपंच.

COMMENTS