अल्पवयीन पत्नीशी संबंध अत्याचार नव्हे- हायकोर्ट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन पत्नीशी संबंध अत्याचार नव्हे- हायकोर्ट

प्रयागराज: पंधरा वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवणे अत्याचार नसल्याचा निर्वाळा अलाहबाद उच्च न्यायालयाने दिलाय. हुंड्यासाठी छळ आणि अनै

सततच्या लॉकडाउनला भाळवणीकर वैतागले, व्यापारी वर्गात प्रशासनाविरुद्ध संताप
नवोदय विद्यालयात आढळले आणखी 12 कोरोना बाधीत
हजारो ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे स्थलांतर थांबवण्यासाठी चलो शिक्षा की ओर या जनजागृती मोहिमेस सुरुवात

प्रयागराज: पंधरा वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवणे अत्याचार नसल्याचा निर्वाळा अलाहबाद उच्च न्यायालयाने दिलाय. हुंड्यासाठी छळ आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध याप्रकरणी सुनावणी करताना कायद्याचे सुधारित कलम 375 च्या आधारे हायकोर्टाने हा निर्णय दिलाय. तसेच आरोपी पतीला अटी-शर्तींसह जामीन मंजूर केलाय. उत्तरप्रदेशातील मुरादाबादच्या भोजपूर पोलिस ठाण्यात 8 सप्टेंबर 2020 रोजी खुशाबे अली या इसमाच्या विरोधात त्याच्या पत्नीने हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याबाबत गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षाच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती मो. असलम यांनी हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यावेळी याचिकाकर्त्याचे वकील केशरीनाथ त्रिपाठी म्हणाले की, आयपीसीच्या कलम 375 मध्ये 2013 मध्ये केलेल्या सुधारणेनुसार, 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे बलात्काराच्या श्रेणीत बसत नाही. सुनावणीनंतर न्यायालयाने म्हटले की, कलम 375 मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. सुधारित कलमाच्या उप-कलम 2 नुसार, जर पत्नीचे वय 15 वर्षांपेक्षा कमी नसेल, तर तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कार ठरणार नाही. न्यायालयाने याचिकाकर्त्याला जामीन मंजूर करताना विविध अटींसह त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

COMMENTS