Homeताज्या बातम्या

जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी प्रशांत बाफना; निवडीचे सर्वस्तरातून स्वागत

शेवगाव: बालमटाकळी येथील मूळ रहिवासी आणि सध्या अहिल्यानगर येथे वास्तव्यास असलेले पत्रकार प्रशांत बाफना यांची जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या अहिल्

जंतर मंतर येथील आंदोलनातील आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर दिल्ली पोलीस कारवाईच्या तयारीत; प्लॅटफॉर्मना नोटीस बजावणार
दिल्लीत भाजपचे पंजाब सरकारविरोधात तीव्र आंदोलन; पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबईत मुसळधार पाऊस, तरीही टप्पा वाढीसाठी विनाअनुदानित शिक्षकांचा एल्गार कायम; आझाद मैदानावर तिसऱ्या दिवशीही ठिय्या

शेवगाव: बालमटाकळी येथील मूळ रहिवासी आणि सध्या अहिल्यानगर येथे वास्तव्यास असलेले पत्रकार प्रशांत बाफना यांची जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव यांनी केली आहे.

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. समाजमनातील वास्तव जनतेपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पत्रकारांवर असते. पक्ष, जात, धर्म, पंथ, भाषा व प्रांत अशी बंधने बाजूला ठेवून पत्रकारांनी आपली लेखणी चालवणे अपेक्षित असते. सध्याच्या डिजिटल आणि पेड न्यूजच्या काळात प्रशांत बाफना हे विश्वासार्ह व मुक्त पत्रकारितेसाठी संपूर्ण जिल्हाभरात ओळखले जातात. समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचून तेथील सकारात्मक कार्य, विचार आणि वास्तव घडामोडी बातमीच्या माध्यमातून मांडण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन नाशिक स्थित जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आल्याचे रफिक सय्यद, सुधीर उमराळकर, सौ. मनीषा पवार आणि अकील पटेल यांनी सांगितले.

पत्रकार बाफना यांच्यावर एकता फाउंडेशन अहिल्यानगरच्या प्रसिद्धीप्रमुखपदाचीही जबाबदारी आहे. त्यांची पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS