Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रूपाली चाकणकरांनी नैतिकेच्या आधारावर पद सोडावे : खा. संजय राऊत

मुंबई : नाशिकमधील कथित भोंदू बाबा प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले असून, या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प

विधानभवनासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला
कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील प्रगतीही महत्त्वाचीमंत्री चंद्रकांत पाटील; 65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन प्रसंगी विविध कला पुरस्कारांचे वितरण
जय पवार मांडणार अजितदादांच्या अपघातावर भूमिका

मुंबई : नाशिकमधील कथित भोंदू बाबा प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले असून, या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका करत नैतिकतेच्या आधारावर पद सोडण्याची मागणी केली आहे.
राऊत यांनी आरोप केला की, नाशिकमधील एका स्वयंघोषित बाबाविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर येत असताना काही प्रभावशाली घटकांकडून त्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. एका महिलेने सहनशक्ती संपल्यानंतर तक्रार दाखल केली, मात्र याआधी अनेक प्रकरणांमध्ये दबाव टाकून तक्रारी रोखल्याच्या चर्चा असल्याचा दावा त्यांनी केला. महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित करत राऊत म्हणाले की, महिलांवरील अत्याचारांविरुद्ध ठाम भूमिका घेणे ही आयोगाची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत संबंधित पदावरील व्यक्तींवरच आरोप होत असतील, तर त्यांची निष्पक्षता संशयात येते. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा त्याग करावा, असे ते म्हणाले. या प्रकरणाला अंधश्रद्धेच्या मुद्द्याचीही जोड मिळाली आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा अस्तित्वात असतानाही काही राजकीय नेते आणि पदाधिकारी कथित बाबाच्या संपर्कात असल्याचे आरोप होत आहेत. या संदर्भात राऊत यांनी सरकारलाही धारेवर धरत, संबंधित सर्व व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.

COMMENTS