Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुद्राणी कन्स्ट्रक्शनचा शेतकर्‍याला फटका

अर्धवट नालीमुळे शेतात पाणी घुसून नुकसान नांदेड । प्रतिनिधी हिमायतनगर तालुक्यातील अर्धापूर तामसा राज्य महामार्गाच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जाची व अर्धव

ई-गव्हर्नन्समध्ये नांदेड पोलीस परिक्षेत्राचा डंका; महाराष्ट्र राज्यात पटकावला प्रथम क्रमांक
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
नांदेड शहरातील फरांदे नगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

अर्धवट नालीमुळे शेतात पाणी घुसून नुकसान
नांदेड । प्रतिनिधी
हिमायतनगर तालुक्यातील अर्धापूर तामसा राज्य महामार्गाच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जाची व अर्धवट नाली केल्यामुळे रुद्र आणि कन्स्ट्रक्शन चा फटका शेतकर्‍याला बसला असून शेतात पाणी घुसून शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने दिघी येथील शेतकरी नारायण किसन घुटे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.
केंद्र व राज्यातील सरकार देशभरातील दळणवळणाची मोठी सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने राज्य व राष्ट्रीय मार्गांचा विकास करीत आहे. याकरिता कोट्यावधी रुपयाची कंत्राटे देऊन कामे चालू आहेत. सदर कामे करताना रस्त्याच्या दुतर्फा नालीचे काम देखील प्रस्तावित करण्यात आले आहे. परंतु अर्धापूर -तामसा राज्य महामार्गावरील हिमायतनगर तालुक्यातील दिघी येथील शेत सर्वे क्रमांक 38/9 चे शेतमालक नारायण किसन घुटे यांची एक हेक्टर 1 आर जमीन आहे. यांच्या शेतात शेजारून राज्य महामार्गाचे काम चालू आहे या रस्त्याच्या दुतर्फा नालीचे काम करणे अपेक्षित असताना रुद्राणी कन्स्ट्रक्शनने अर्धवट नालीचे काम केल्याने सदर शेतकर्‍याच्या शेतात पाणी घुसून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. रुद्राणी कन्स्ट्रक्शनचे संबंधित सुपरवायझर व राज्य महामार्ग विभागाचे अभियंता यांना वारंवार तक्रार व पाठपुरावा करून देखील सदर अर्धवट नाली मुळे यामध्ये पाणी घुसून होणारे पिकांचे नुकसान थांबलेले नाही. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील दिघी येथील शेतकरी नारायण किशन घुटे हे दि.26 जानेवारी 2025 पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

COMMENTS