Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवारांच्या अडचणीत वाढ; राज्य बँक घोटाळ्याची ’पीएमएलए’ कोर्टाकडून दखल

मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवस

तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडेच
अजित पवारांच्या पाठपुराव्यानंतर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांचा प्रश्‍न लागला मार्गी
अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, ही तर दिल्लीश्‍वरांची इच्छा

मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (एऊ) दाखल केलेल्या आरोपपत्राची पीएमएलए कोर्टाकडून घेण्यात आली. सातार्‍याच्या कोरेगावमधील जरंडेश्‍वर एस.एस. के कारखानाच्या गहाण मालमत्तेसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर सरकारी बँकने 226 कर्ज घेतले होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक फायद्यासाठी कारखान्याची मालमत्ता कवडीमोल दराने संपादीत केली, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. याप्रकरणी ईडीने एप्रिल महिन्यात आरोपपत्र दाखल केले होते, याची विशेष पीएमएलए कोर्टाकडून दखल घेण्यात आली. यावेळी न्यायाधीश देशपांडे यांनी काही निरीक्षण नोंदवून याप्रकरणाशी संबंधित लोकांना समन्स बजावण्यात आले आहेत. यामुळे अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शिखर बँकेने जरंडेश्‍वर साखर कारखान्याचा लिलाव केला. त्यावेळी हा कारखाना मुंबईतील गुरू कमॉडिटीज नामक कंपनीने खरेदी केला. यानंतर हा कारखाना दीर्घ काळासाठी जरंडेश्‍वर शुगर मिल्स प्रा. लि. कंपनीला दिला. या कंपनीची मालकी स्मार्पिंक प्रा.लि. कडे आहे, ज्याच्या संचालक अजित पवार यांच्या पत्नी होत्या. हा कारखाना अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीला का देण्यात आला? असा प्रश्‍न कोर्टाने उपस्थित केला आहे. महाराष्ट्र शिखर बँकने कारखान्याला वेळोवेळी कर्ज दिले. परंतु, 80 कोटींची थकबाकी असताना या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. लिलावातील 826 कोटी रुपये कमोडिटीज कंपनीला देण्यात आले. या सर्व अफरातफरी अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी मोठा आर्थिक फायदा पोहोचण्यासाठी झाला, असे न्यायमूर्ती देशपांडे यांनी आपल्या निरीक्षणात म्हटले आहे.

COMMENTS