Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वराज्य पक्षाच्या वतीने एक महिना सुरू असलेल्या महिला सक्षमीकरणासाठी मोफत प्रशिक्षणाचा माडसांगवी या ठिकाणी समारोप

नाशिक प्रतिनिधी - स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य या संकल्पनेच्या माध्यमातून नाशिक जिल्हा स्

म्हाळुंगी पुलावरील 10 सुशोभीकरण कुंड्याची विकृत प्रवृत्ती कडून नासाडी
राजद्रोहाला स्थगिती एक कार्यकारणभाव!
तालुक्यातील शेअरधारकांना वेठीस धरल्यास ‘अंबालिका’ सुरू होऊ देणार नाही : महेंद्र धांडे

नाशिक प्रतिनिधी – स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य या संकल्पनेच्या माध्यमातून नाशिक जिल्हा स्वराज्य पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने महिला सक्षमीकरण या माध्यमातून विविध मोफत प्रशिक्षणाचे शिबिर वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जात असून त्याच उपक्रमांमधील एक माडसांगवी चारी नंबर सहा या ठिकाणी एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले त्या प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमासाठी स्वराज्य संपर्कप्रमुख तथा प्रवक्ते मा करण गायकर हे अध्यक्ष म्हणून कार्यक्रमासाठी उपस्थित होते.हा कार्यक्रम *माडसांगवी सहा चारी* या ठिकाणी मारुती मंदिरात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला स्वराज्य संपर्कप्रमुख मा करण गायकर तसेच उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी,ग्रामीण जिल्हाप्रमुख रुपेश नाठे,राज्य कार्यकारिणी सदस्य किरण डोखे,ज्ञानेश्वर थोरात तसेच महिला पदाधिकारी उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख सौ मनोरमा ताई पाटील,जिल्हाप्रमुख सुलक्षणाताई गवळी,जिल्हा संघटक रेखाताई जाधव,जिल्हा संपर्कप्रमुख रेखाताई पाटील,नाशिक महिला उद्योग आघाडी महानगरप्रमुख मीनाक्षीताई पाटील,नाशिक महानगर प्रमुख निशिगंधा पवार,नाशिक शहर उपमहा नगर प्रमुख रागिनी आहेर आयटीसी राज्य कार्यकारिणी सदस्य वैभव दळवी,अजय कश्यप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच आज नव्याने या ठिकाणी महिलांना एलईडी बल्ब चे प्रशिक्षण सुरू करण्यात आले त्याची आज अश्विनी महाले यांनी माहिती देऊन या प्रशिक्षनाला सुरुवात केली तसेच महिलांना एएलईडी बल्ब उद्योग करण्यासाठी सविस्तर असे मार्गदर्शन केले.

यावेळी या प्रशिक्षणाला स्वराज्य पक्ष राज्य संपर्कप्रमुख करण गायकर,उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी,ग्रामीण जिल्हाप्रमुख डॉ.रुपेश नाठे,उत्तर महाराष्ट्र प्रमुख महिला आघाडी मनोरमाताई पाटील,जिल्हाप्रमुख सुलक्षणाताई भोसले,यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

या ठिकाणी महिलांना एक महिना फॅशन डिझायनिंग चे प्रशिक्षण मुक्ताताई खोडे व रेणुका ताई पेखळे यांनी दिले त्यात त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या नऊवारी शिकवल्या त्याचबरोबर नाशिक महानगर प्रमुख निशिगंधा पवार यांनी वेगळ्या प्रकारच्या राख्या बनविण्याचे प्रशिक्षण सहभागी महिलांना दिले दिले.तसेच येणाऱ्या रक्षाबंधन साठी महिलांना काम मिळावे म्हणून त्यांना स्वराज्य पक्षाच्या वतीने काही राख्या बनविण्याचे कामही दिले.सहभागी महिलांकडून त्यांच्या कामाच्या बाबत खूप छान अशी वरिष्ठांना माहिती दिली अनेक वेळा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शासनाच्या वतीने सुरू केलेल्या प्रशिक्षणात भाग घेतला परंतु स्वराज्याच्या वतीने घेत असलेल्या प्रशिक्षणात खूप छान असे प्रशिक्षण मिळाले.या समारोपणाच्या उपस्थित मान्यवरांसमोर प्रशिक्षण घेत असलेल्या महिला विषयी असे उद्गार येणे म्हणजे त्यांच्या कामाचा खरा अर्थाने हा मोठा गौरव होता.

 स्वराज्य पक्षातील पदाधिकाऱ्यांचे कौतुक जेव्हा दुसऱ्यांच्या तोंडातून ऐकायला भेटते ते सुख वेगळेच असते.असे मत मार्गदर्शन करताना उत्तर महाराष्ट्र प्रमुख सौ मनोरमा ताई पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी माडसांगवी गावातील महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

COMMENTS