Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा शल्यचिकित्सकांकडून लोखंडीच्या वृद्धत्व व स्त्री रुग्णालयांचा आढावा

बीड प्रतिनिधी - जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी शनिवारी (दि. 22) लोखंडी सावरगाव (ता. अंबाजोगाई) येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक उपचार के

सोलापूर विभागातील तिकीट निरीक्षकांचा गौरव
ठाणे ते बोरिवली प्रवास होणार आता 20 मिनिटांत
कॉलेजियम पद्धत आणि संभ्रम

बीड प्रतिनिधी – जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी शनिवारी (दि. 22) लोखंडी सावरगाव (ता. अंबाजोगाई) येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक उपचार के्ंरद तसेच स्त्री रुग्णालयांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी डॉ. साबळे यांनी दोन्ही रुग्णालयांच्या अंतररुग्ण विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधून उपचाराबाबत विचारपूस केली.
वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्रात अस्थिरोगाच्या विविध शत्रकिया तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया व उपचार लवकरच सुरू करण्यासाठी व रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा देण्याच्या सुचना संबंधीत अधिकार्‍यांनाकेल्या. स्त्री रूग्णालयात संस्थात्मक प्रसुती वाढवण्याबाबतही डॉ. साबळे यांनी सुचना दिल्या. या ठिकाणी नव्याने बाह्य स्त्रोत यंत्रणेद्वारे रिक्त 79 विविध पदे भरली असुन या ठिकाणी नव्याने नेमणूक केलेल्या वार्ड बॉय यांनी साफसफाईचे काम नियमित करावे, अन्यथा काम न करणार्‍यांच्या सेवा थांबविल्या जातील, असा इशाराहीदिला. टेली मानस या मानसिक आरोग्य कार्यक्रमातील सर्व कर्मचारी यांना कॉलची संख्या वाढवण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे आदेश डॉ. सुरेश साबळे यांनी दिले.अंबाजोगाई तालुक्यातील ्रगामीण भागातील रुग्णांना लोखंडी सावरगाव येथील मानसिक आरोग्य व वृद्धत्व उपचार के्ंरद तसेच स्त्री रुग्णालयात याच ठिकाणी सेवा भेटाव्यात, त्यांना रेफर करु नये, असेही डॉ. साबळे म्हणाले. सर्व अधिकारी व स्टाफची आढावा बैठक झाली. यावेळी मानसिक आजार के्ंरद व वृद्धत्व उपचार केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुणा केंद्रे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. राम आव्हाड आदींची उपस्थिती होती.

COMMENTS