Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महीलांनी उसतोडीला पर्याय शोधावा, प्रशासन मदत करेल-जिल्हाधिकारी

बीड प्रतिनिधी - महीलांनी गावातच नवीन रोजगार, उद्योग शोधून प्रयत्न केले पाहिजेत, जिल्हा प्रशासन तुम्हाला मदत करायला तयार आहे.  तुमच्या अनेक पिढ्य

धक्कादायक डिलिव्हरी; डॉक्टरांनी बाळाचं डोकं कापून ठेवले गर्भाशयातच | LokNews24
शिवनी येथील घरफोडी प्रकरणी गुन्हेगारास मुद्देमालासह अटक
तृतीयपंथीयांना पोलीस दलात संधी मिळावी; अन्यथा… 

बीड प्रतिनिधी – महीलांनी गावातच नवीन रोजगार, उद्योग शोधून प्रयत्न केले पाहिजेत, जिल्हा प्रशासन तुम्हाला मदत करायला तयार आहे.  तुमच्या अनेक पिढ्या उसतोडी मध्ये गेल्या आहेत , आता महिलांनी ऊसतोडीला जावू नये. कुकुट पालन, शेळी पालन, शेरी कल्चर या सारखे व्यवसाय करुन आपली उसतोडी थांबवावी. असे विचार बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी व्यक्त केले. महीला उसतोड कामगार संघटनेच्या मेळाव्यात उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे बोलत होत्या.  आम्हाला उसतोडी करायला आवडत नाही. आम्हाला सरकारने स्थानिक ठिकाणी काम उपलब्ध करुन द्यावे. आम्ही ते करायला तयार आहोत पण      जोपर्यंत आम्हाला उसतोडी करावी लागत आहे. तो पर्यत आम्हाला आमचे अधिकार मिळाले पाहिजेत. उसतोड कामगार महीलांना सुरक्षित व आरोग्य दायी आयुष्य जगता यावे या साठी महिला उसतोड कामगार संघटना कटीबद्ध आहे. असे महीला उसतोड कामगार संघटनेच्या नेत्या मनिषा तोकले महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या. आपल्याला संघटनेची गरज आहे. ती आपण केली पाहिजे. जो पर्यंत आपण संघटीत हो नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असे मकामच्या राज्य समन्वयक सिमा कुलकर्णी यांनी महीलांना आवाहन केले.
महिला उसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सर्व्हे मधील सत्यशोधन अहवालाची व कामाची मांडणी पल्लवी हर्षे यांनी केली. बाल  विवाह प्रतिबंधक कायद्याची माहीती तत्वशिल कांबळे अध्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान बीड  यांनी दिली व कुणीही उसतोड कामगार परिवारातील लोकांनी मुलामुलींचे बाल विवाह करू नका असे आवाहन केले. पशु संवर्धनचे सह आयुक्त देशपांडे यांनी महीलांना शेळी पालना संबंधी माहिती दिली. व शेळी पालन हा उसतोडीला पर्याय होवू शकतो. तरी  महीलांनी शेळी पालना सारख्या व्यवसाय उसतोडीला पर्याय म्हणून स्विकारावा असे सांगितले. बाल कल्याण समिती चे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी बालकांसाठी असणार्‍या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. दीपा वाघमारे, द्वारका वाघमारे, जयश्री ओव्हाळ, कांता मुंडे, राणी ससाने यांनी उसतोड कामगार महिलांच्या प्रश्नांची मांडणी केली. ग्रामसेवकाकडे जावून उसतोडीची नोंदणी करुन घेवू. संघटना बांधणी करु. मुलांमुलींचा बाल विवाह करणार नाही. मुलां मुलींना शाळेत घालू.  असे ठराव सुवर्णा कसबे आणि रिमा भोले यांनी मांडले व एक मुखाने हे ठराव पारीत केले. महीला उसतोड कामगार संघटनेचा मेळावा दिनांक 21 जूलै 2023 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रांती खळगे यांनी केले तर आभार ज्योती थोरात यांनी मानले. संविधानाचे प्रास्ताविका वाचून कार्यक्रम सुरू झाला. सुवर्णा कसबे यांनी प्रास्ताविकाचे वाचन केले. तर राष्ट्रगीत गाऊन समारोप करण्यात आला. या मेळाव्याला बीड व गेवराई तालुक्यातील उसतोड कामगार महीलां संघटनेच्या सभासद महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

COMMENTS