Homeताज्या बातम्या

घरगणनेत भटक्या-विमुक्तांच्या पालांचा समावेश होईल का? ऍड. अरुण जाधव यांचा शासनाला सवाल

जामखेड : शासनाकडून सध्या घरगणना मोहीम राबविण्यात येत असून त्यानंतर जनगणना होणार आहे. मात्र, घरगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावरील अर्जात

बहुजन समता पार्टीच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी दिगंबर खुडे यांची नियुक्ती
NEET प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणात आणखी दोघांना अटक; एक डॉक्टर तर दुसरा प्राध्यापक, आतापर्यंत १३ आरोपी ताब्यात
संजीवनीच्या आकांक्षा भास्करची नौदलात निवड; उपलेफ्टनंट पदाला गवसणी, शेतकरी कुटुंबातील लेकीची मोठी झेप

जामखेड : शासनाकडून सध्या घरगणना मोहीम राबविण्यात येत असून त्यानंतर जनगणना होणार आहे. मात्र, घरगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावरील अर्जात पाल, कुड किंवा कोपी यांचा स्वतंत्र उल्लेख नसल्याने भटके-विमुक्त समाजाची नोंद कशी होणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. भटके-विमुक्त समाजाचे राज्यस्तरीय नेते ऍड. अरुण जाधव यांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला.

भटके-विमुक्त समाजातील ४२ जातींमध्ये जनगणनेबाबत जागृती करण्यासाठी ५ ते १५ मे २०२६ या कालावधीत राज्यव्यापी ‘मुशाफिरी यात्रा’ काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेस उमाताई जाधव, बापू ओहळ, ललिताताई पवार, रेश्माताई बागवान, संतोष चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

ऍड. जाधव म्हणाले की, भटके-विमुक्त समाज उपजीविकेसाठी सतत स्थलांतर करत असतो. त्यामुळे त्यांच्या तात्पुरत्या घरांची (पाल) नोंद घरगणनेत झाली नाही, तर पुढील जनगणनेत त्यांची अचूक संख्या कशी निश्चित होणार? जनगणना न झाल्यास समाजासाठी आवश्यक निधीचे नियोजन, कल्याणकारी योजनांचा लाभ आणि विकास आराखडे तयार करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होतील. संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार या समाजाला मिळावेत यासाठी शासनाने घटनात्मक मार्ग काढून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, घरगणनेत भटक्या समाजाच्या पालांचा समावेश करणार की नाही, याबाबत शासनाने आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

COMMENTS