कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहात कर्मचारी आणि व्यवस्थापन यांचे नाते केवळ कामापुरते मर्यादित नाही. काळे परिवाराने प्रत्येक कर्मचाऱ्याला कुटुंबातील सदस्य मानले आहे. सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा आपण जपली आहे. हीच आपल्या संस्थेची खरी ताकद आणि खरी ओळख आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती ही नोकरीची आहे नात्याची नाही असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व आसवनी विभागातील सेवा निवृत्त होणाऱ्या ४१ कर्मचा-यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त कर्मचाऱ्यांचा कुटुंबासह आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपल्या कारखान्याने आणि उद्योग समूहाने आजवर जी प्रगती केली, जे यश मिळवले, जे पुरस्कार मिळवले, त्या प्रत्येक यशामध्ये तुमच्या कष्टांचा, निष्ठेचा आणि प्रामाणिकपणाचा मोठा वाटा आहे. तुमचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद नेहमीच या उद्योग समूहाच्या आणि काळे परिवाराच्या पाठीशी राहिले आहेत. सेवानिवृत्ती ही नोकरीची असते; नात्याची कधीच नसते. तुम्ही या कारखान्याचे आणि काळे परिवाराचे अविभाज्य घटक होता, आहात आणि कायम राहाल. या संस्थेचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमीच खुले राहतील. सेवा संपली असली तरी आपले नाते कायम राहील. यापुढील आयुष्यात आवडी-निवडी जपा, आयुष्याचा आंनंद घ्या. या प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रविण शिंदे, संचालक सुधाकर रोहोम, दिलीपराव बोरनारे, सूर्यभान कोळपे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, शंकरराव चव्हाण,राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे यांसह निवृत्त कर्मचारी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहात कर्मचारी आणि व्यवस्थापन यांचे नाते केवळ कामापुरते मर्यादित नाही. काळे परिवाराने प्रत्येक कर्मचाऱ्याला कुटुंबातील सदस्य मानले आहे. सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा आपण जपली आहे. हीच आपल्या संस्थेची खरी ताकद आणि खरी ओळख आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती ही नोकरीची आहे नात्याची नाही असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व आसवनी विभागातील सेवा निवृत्त होणाऱ्या ४१ कर्मचा-यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त कर्मचाऱ्यांचा कुटुंबासह आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपल्या कारखान्याने आणि उद्योग समूहाने आजवर जी प्रगती केली, जे यश मिळवले, जे पुरस्कार मिळवले, त्या प्रत्येक यशामध्ये तुमच्या कष्टांचा, निष्ठेचा आणि प्रामाणिकपणाचा मोठा वाटा आहे. तुमचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद नेहमीच या उद्योग समूहाच्या आणि काळे परिवाराच्या पाठीशी राहिले आहेत. सेवानिवृत्ती ही नोकरीची असते; नात्याची कधीच नसते. तुम्ही या कारखान्याचे आणि काळे परिवाराचे अविभाज्य घटक होता, आहात आणि कायम राहाल. या संस्थेचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमीच खुले राहतील. सेवा संपली असली तरी आपले नाते कायम राहील. यापुढील आयुष्यात आवडी-निवडी जपा, आयुष्याचा आंनंद घ्या.
या प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रविण शिंदे, संचालक सुधाकर रोहोम, दिलीपराव बोरनारे, सूर्यभान कोळपे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, शंकरराव चव्हाण,राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे यांसह निवृत्त कर्मचारी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS