Homeताज्या बातम्यादेश

अरुण गोयल यांनी स्वीकारला निवडणूक आयुक्ताचा पदभार

नवी दिल्ली : अरुण गोयल(Arun Goyal) यांनी सोमवारी भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. अरुण गोयल हे पंजाब केडरचे 1985 च्या बॅचचे

ऐफाज व तैमुर ने धरले रमजानचा उपवास
शेती क्षेत्रामध्ये आधुनिकता आणली पाहिजे : खा. शरद पवार
Mumbai : यूट्यूबवरून प्रशिक्षण घेत चोरी| LOKNews24

नवी दिल्ली : अरुण गोयल(Arun Goyal) यांनी सोमवारी भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. अरुण गोयल हे पंजाब केडरचे 1985 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्यासह निवडणूक पॅनेलमध्ये सामील होतील. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवृत्त आयएएस अधिकारी अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अरुण गोयल यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. सुशील चंद्र यांच्या निवृत्तीनंतर तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर 15 मे पासून तीन सदस्यीय आयोगातील एका निवडणूक आयुक्ताचे पद रिक्त होते. या पदावर अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय कायदे मंत्रालयाने एक प्रसिद्धी पत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली.

COMMENTS