दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन 2026 ते 2031 या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. महाराष्ट्र कामगार कल्या

दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन 2026 ते 2031 या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ललित कला भवन येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज हिरे यांनी अधिकृत निकाल घोषित करताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.
भटक्या विमुक्त जाती-जमाती व विमुक्त भटक्या प्रवर्ग मतदारसंघातून ज्ञानेश्वर ओमप्रकाश दहिफळे यांनी 990 मते मिळवत उकंडराव मोहनसिंग जाधव यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात रामचंद्र विठ्ठलराव मुसळे यांनी 1,068 मते मिळवत प्रभावी विजय मिळवला. इतर मागासवर्गीय (ओबीसी) मतदारसंघातून अनिल गोपाळराव पाटील यांनी 1,031 मते मिळवत विजय संपादन केला. तालुकानिहाय प्राथमिक कृषी पतपुरवठा व धान्य अधिकोष संस्था मतदारसंघात नांदेडमधून संगीता विठ्ठल पाटील, अर्धापूरमधून बालाजी रामजी कदम, मुदखेडमधून मारोती आनंदराव जाधव, धर्माबादमधून दत्तात्रय लक्ष्मण रेड्डी, भोकरमधून राजू गंगाधर जाधव आणि हदगावमधून कृष्णा नागेश पाटील हे विजयी झाले. देगलूर मतदारसंघात विजयसिंह बाळासाहेब देशमुख यांनी श्वेता पाटील यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव करत विजय मिळवला. हिमायतनगरमध्ये माधवराव निवृत्तीराव पवार यांनी विशाल राठोड यांचा केवळ एका मताने पराभव करून अत्यंत चुरशीच्या लढतीत बाजी मारली. माहूर मतदारसंघात राजेंद्र नामदेवराव केशवे यांनी ज्योतीबा खराटे यांचा दोन मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत काही मतदारसंघांत एकतर्फी निकाल लागले, तर काही ठिकाणी अत्यंत अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. नव्या संचालक मंडळाकडून बँकेची आर्थिक प्रगती, सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रभावी निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा सभासदांकडून व्यक्त केली जात आहे.

COMMENTS