माजलगाव : अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने रद्द करून आरक्षणाची विद्यमान व्यवस्था अबाधित ठेवावी, या मागणीसाठी रिपब्लिकन

माजलगाव : अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने रद्द करून आरक्षणाची विद्यमान व्यवस्था अबाधित ठेवावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) माजलगाव तालुक्याच्या वतीने सोमवार, दि. 27 जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अविनाश जावळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात रिपाइं (आठवले) चे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण केल्यामुळे समाजातील घटकांमध्ये विभाजनाची भावना निर्माण होण्याची शक्यता असून, सामाजिक न्यायाच्या मूळ उद्देशालाच धक्का पोहोचू शकतो, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. यावेळी बोलताना अविनाश जावळे म्हणाले की, भारतीय संविधानाने सामाजिक न्यायाच्या माध्यमातून वंचित घटकांना समान संधी आणि प्रतिनिधित्वाचा अधिकार दिला आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करून समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये. उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घेऊन अनुसूचित जातींचे विद्यमान आरक्षण अबाधित ठेवावे, अशी आमची ठाम मागणी आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर रिपाइं (आठवले) ची भूमिका स्पष्ट असून समाजाच्या संवैधानिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी यापुढेही लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच ठेवण्यात येईल असा इशारा अविनाश जावळे यांनी दिला. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले असुन अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करून समाजाच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शासनाने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. प्रसंगी आंदोलनात सहभागी किशोर जावळे, राहुल वाघमारे, मधुकर साळवे, विजय डावरे, राजू तुपारे, दिलीप भालेराव, रमेश तुपारे, अण्णा माने, बाबा देशमाने, भगवान ससाणे, मिलिंद नाकलगावकर, ओम सोनकांबळे, वामन पाईक, भारत डावरे, धम्मा पोटभरे, सिद्धार्थ तुपारे, हरिश जावळे, सिद्धार्थ खिल्लारे, कपिल जावळे, अनिल भराटे, अशोक भालशंकर, रामा जाधव, पप्पू साळवे यांच्यासह रिपाइं (आठवले)चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS