नांदेड : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असताना नांदेड शहरातील वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता

नांदेड : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असताना नांदेड शहरातील वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता महावितरणने शहरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, अखंड आणि नियोजनबद्ध करण्यासाठी व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून, भविष्यात वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी प्रभावी यंत्रणा उभारली जाणार असल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे मुख्य अभियंता राजाराम माने यांनी दिली.
दि. 28 एप्रिल रोजी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मुख्य अभियंता माने यांची भेट घेऊन शहरातील वीज समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी शहरात नवीन वितरण पेट्या बसविणे, वाढता वीजभार कमी करणे, तांत्रिक अडचणी दूर करणे आणि मान्सूनपूर्व दुरुस्ती कामांना गती देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांनी बैठकीत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. कुठलीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित होणे, तक्रार केंद्रावर फोन न लागणे, चुकीची वीजबिले, वीज बिल भरल्यानंतरही जोडणी न होणे, एकाच वितरण पेटीवरील वारंवार फ्यूज जाणे, पाणीपुरवठ्यावेळी वीज गायब होणे अशा समस्या मांडण्यात आल्या. यावर सर्व तक्रारी गांभीर्याने घेऊन तत्काळ उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन माने यांनी दिले. भूमिगत वीजजाळ्यासाठी 400 कोटींची गरज शहरातील वीज समस्या कायमस्वरूपी सोडवायच्या असतील तर भूमिगत वीजवाहिन्यांचा पर्याय अत्यंत उपयुक्त ठरेल. नांदेड शहरात अशा प्रकल्पासाठी सुमारे 400 कोटी रुपयांची आवश्यकता असून लोकप्रतिनिधी व महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, असे मतही माने यांनी व्यक्त केले. प्रत्येक वितरण पेटीवर तक्रार क्रमांक नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी शहरातील प्रत्येक वितरण पेटीवर संबंधित कर्मचार्याचा संपर्क क्रमांक लावण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना थेट तक्रार नोंदविता येणार असून समस्या सोडविण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे. एकूणच, वाढत्या उष्णतेत त्रस्त झालेल्या नांदेडकरांसाठी महावितरणच्या या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS