Homeताज्या बातम्या

राहुरीचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून रविंद्र देशमुख यांची नियुक्ती; गुन्हेगारी नियंत्रण आणि पुतळा विटंबना प्रकरणाचे मोठे आव्हान

देवळाली प्रवरा : राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची श्रीगोंदा येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी आता पोलीस निरीक्षक रविंद्र द

राहुरीत ‘मिशन अँटी ड्रोन’ सुरूच; संशयास्पद ड्रोनची संख्या घटली, मात्र गूढ कायम
मुळा धरणातील प्रवासी बोट कालबाह्य; नागरिकांच्या जीवाशी खेळ, नवीन अत्याधुनिक बोटीची मागणी
राहुरीत रहस्यमय ड्रोनचे गूढ अधिक गडद; अँटी-ड्रोन पथकाची कारवाई निष्फळ, आकाशात १० ड्रोन दिसल्याचा दावा

देवळाली प्रवरा : राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची श्रीगोंदा येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी आता पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांची राहुरी येथे नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या बदल्यांमुळे राहुरी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमधून नव्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.

नवे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी पदभार स्वीकारला असून त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर असणार आहे. राहुरी शहरातील बुवासिंग बाबा तालीम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध घेणे हे त्यांच्यासमोरील सर्वात मोठे व तातडीचे आव्हान आहे. या संवेदनशील प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर कमालीचे वातावरण तापले होते.

याशिवाय, राहुरी तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत तब्बल तीन खुनांच्या घटना घडल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे, अवैध दारू विक्री, मटका, जुगार यांसारख्या बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करणे आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण करणे ही मुख्य जबाबदारी नव्या पोलीस निरीक्षकांवर असेल. राहुरी तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी आणि सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी पीआय रविंद्र देशमुख काय पावले उचलतात, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS