Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा आज दीक्षांत सोहळा : मंत्री लोढा

मुंबई : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, 21 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये

शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
भारताने स्टील उत्पादनांवर लादले आयात शुल्क
भाजप नेते पवन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी

मुंबई : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, 21 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये होणार आहे. या  कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणार्‍या या विद्यापीठाचा हा पहिलाच दीक्षांत समारंभ असून राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या कार्यक्रमाला  उपस्थित राहणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या तरुणांचे सामर्थ्य ओळखले असून त्यांनी देशभरात कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील कौशल्य विभाग तरुणांसाठी विविध रोजगाराभिमुख उपक्रम राबवत आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ हे उद्योगाभिमुख शिक्षण देणारे अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. या विद्यापीठात काळानुरूप  विषयावरील अभ्यासक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळणार आहे.

COMMENTS