Homeदखल

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनिमित्ताने !

 प्रखर नीतिमत्ता आणि राजकीय दूरदर्शीतेचा दावा करणाऱ्या अनेक नेत्यांनी, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात दीर

कार्यकर्त्यांना जीव लावणारे नेतृत्व हरपले : आ. काळे
राष्ट्रवादी विलीनीकरणाचा कलगीतुरा !
देगलूर पालिकेच्या नगराध्यक्षपदी  विजयामाला टेकाळे, उपनगराध्यक्षपदी अ‍ॅड.अंकुश देगावकर विराजमान

 प्रखर नीतिमत्ता आणि राजकीय दूरदर्शीतेचा दावा करणाऱ्या अनेक नेत्यांनी, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात दीर्घ काळ राजकीय पाया मजबूत केला. त्यांच्या अथक प्रयत्नांनीच पार्टीची ओळख, महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी जनतेचा आधार वाढवला. पण २०२३ नंतर पक्षाच्या विभाजनानंतर ज्याप्रमाणे अजितदादा पवार यांनी स्वतःचा स्वतंत्र नेतृत्वाचा पाया उभा केला, त्या वाटेवर त्यांनीही पक्षाचे हित स्वतःच्या दृष्टिकोनातून पुढे नेले—याचा मोठा राजकीय परिणाम झाला.
आता, २८ जानेवारी २०२६ रोजी घडलेल्या अपघाताने केवळ एका राजकीय नेत्याचा मृत्यू झाला नाही; महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर एक मोठे रिक्तस्थान निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या अर्थ आणि नियोजनाच्या प्रमुख नेत्याच्या अचानक निधनाने सत्तेतील समतोल विस्कटला आहे. पण  काही नेते आणि त्यांच्या  धारणा असणार्‍या वक्तव्यांमधून जे दिसते ते म्हणजे पक्षाचे एकत्रीकरण होवू नये; यासाठी, प्रफुल्ल पटेल सारखे नेते आघाडीवर आहेत. अर्थात अशी परिस्थिती अचानक येत नाही; तर, त्यासाठी, कुटुंबातील अगदी जवळच्या सदस्यांना आधी फोडले जाते. वास्तविक, पक्ष उभारणी करणे ही साधी बाब नसते. महाराष्ट्रात तीनच असे राजकीय नेते आहेत किंवा झाले ज्यांनी राज्यात राजकीय पक्षांची उभारणी केली. त्यात शिवसेना उभारणारे बाळासाहेब ठाकरे, तर, राष्ट्रवादी काँग्रेसची उभारणी करणारे शरद पवार आणि तिसरे नेते म्हणजे ज्यांनी आधी भारिप-बहुजन महासंघ आणि आता वंचित बहुजन आघाडीची उभारणी केली ते ऍड. प्रकाश आंबेडकर. अर्थात,  तीन नेत्यांशिवाय अन्य कोणत्याही नेत्याचे नाव पक्ष उभारणीत घेता येणार नाही. यांच्या व्यतिरिक्त जे आहेत ते नेते नव्हे तर, आमदार, खासदार, नगरसेवक, सदस्य एव्हढंच! या बाबीचा विचार करता केवळ योगायोगाने पक्षाचे नेते बनलेले नेते पक्ष अधिक काळ चालवू शकत नाही. त्यात दुर्दैवाने अजितदादा पवार अचानक एक्झिट करून गेल्याने त्यांच्या पश्चात एकत्रीकरणाच्या प्रक्रियेत त्यांचेच साथीदार अडथळा निर्माण करत आहेत. अर्थात , सत्तेचा मोह कुटूंबाने ठेवला तर, पक्ष टिकविण्यासाठी ते अवघड होईल. “एकत्रीकरणाच्या दिशेने वाटचाल,” आणि तिथे उभे राहणारे विरोधक केवळ राजकीय स्वार्थापोटी अडथळा आणू पाहत आहेत, महाराष्ट्राच्या हितापेक्षा स्वहितासाठी उभे राहिलेले दिसतात. जेव्हा राजकीय कुटुंबाला एकजूट करून पुढे जाण्याची संधी होती, तेव्हा काही नेते अचानक विरोधकांच्या भूमिकेत दिसत आहेत.  हे काही सहज होत नाही.‌ यामागे, अजितदादा यांच्या सोबत राहिलेल्या नेत्यांचा वेगळा मानस आहे. अजितदादा पवार यांचा अचानक हरवलेला आवाज आज महाराष्ट्राच्या भविष्यावर मोठा प्रश्नमार्क ठेऊन गेला आहे. आणि जे काही नेते या क्षणाचा उपयोग आपला हेतू साध्य करण्यासाठी पुढे  करत आहेत, ते वास्तवात राजकीय धूर्तपणा आणि स्वार्थासाठीच उभे आहेत असे प्रत्येक नागरिकाला दिसत आहे. राजकारणात मतभेद होणे सामान्य आहे. पण ते मतभेद प्रजाजनहितासाठी, धोरणात्मक दृष्टीकोनासाठी असायला हवेत; ना कि स्वार्थासाठी. महाराष्ट्राची जनता आज विज्ञान, विकास, रोज़गार, शिक्षण आणि जीवनमान वाढवणाऱ्या राजकारणाची अपेक्षा करते; काही निवडक नेते मात्र हे क्षण वापरून स्वतःचा अप्पलपोटेपणा सिद्ध करीत आहेत आणि तो महाराष्ट्राच्या हिताच्या विरुद्ध आहे. आता काळ आहे, एकात्मतेचा, परस्पर समजाचा आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचा ना कि विरोधासाठी विरोधाचा. ज्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी काम केले, त्यांच्या स्मरणातून ही दिशा शोधण्याची गरज आपल्याला आहे. राजकारण हे केवळ सत्ता-समीकरणांचे गणित नसते; ते मूल्य, निष्ठा आणि संघटनात्मक कृतज्ञतेवर उभे असते. शरद पवार यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची उभारणी करताना हेच तत्त्व केंद्रस्थानी ठेवले होते. वैचारिक मतभेद असूनही त्यांनी कार्यकर्त्यांना संधी दिली, नेतृत्व घडवले आणि पक्षाला राष्ट्रीय ओळख मिळवून दिली. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या सत्तासमीकरणांतून एक वेगळा गट सत्तेत गेला. ते राजकीय वास्तव होते—त्यावर मतभेद असू शकतात, पण ते लोकशाही प्रक्रियेचाच भाग होते. मात्र पुढील टप्प्यावर, पक्षातील दुभंगलेपण संपवण्याची शक्यता निर्माण झाली असताना, काही नेत्यांनी त्या प्रक्रियेविरोधात उभे राहणे हा केवळ राजकीय निर्णय न राहता नैतिक प्रश्न बनतो.

COMMENTS