Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हॉटेलमधील रंगपंचमीचा कार्यक्रम पोलिसांनी उधळला

कराड / प्रतिनिधी : मलकापूर हद्दीत महामार्गावर असलेल्या महामर्गावरील ग्रीनलॅन्ड हॉटेलमध्ये युवक-युवतींना एकत्र करून रंगपंचमीनिमित्त आयोजित केलेला

LokNews24 l जनसामान्यांचे हक्काचे; तुमचे आजचे राशीचक्र गुरुवार, २६ ऑगस्ट २०२१ l पहा LokNews24
विशाळगडावरील अतिक्रमणे महाशिवरात्रीपूर्वी काढणार
माझी वसुंधरा अभियान; पुणे विभाग राज्यात प्रथम ; विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

कराड / प्रतिनिधी : मलकापूर हद्दीत महामार्गावर असलेल्या महामर्गावरील ग्रीनलॅन्ड हॉटेलमध्ये युवक-युवतींना एकत्र करून रंगपंचमीनिमित्त आयोजित केलेला रंग बरसे कार्यक्रम पोलिसांनी उधळला. कोणतीही परवानगी न घेता ग्रीन लॅन्ड या हॉटेलमध्ये कार्यक्रम होणार होता. कार्यक्रमापूर्वीच जमलेल्या युवक, युवतींना पोलिसांनी हकलले. मात्र, आयोजक किंवा हॉटेलवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
रंगपंचमीच्या दिवशी ग्रीन लॅन्ड हॉटेलमध्ये रंग बरसे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सहभागी होण्यासाठी आयोजकांकडून ऑनलाईन व प्रत्यक्ष तिकिटांची विक्री करण्यात आली होती. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग घेणार्‍यांना 350 रूपये व कार्यक्रमावेळी प्रत्यक्ष येणार्‍यांना 500 रुपयाला तिकीट दिले जाणार होते. यासाठी आठवडाभरापासून ऑनलाईन बुकिंग सुरू होते. रंगपंचमी दिवशी हायवेलगत असलेल्या या हॉटेलच्या परिसरात युवक-युवतींची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि अमित बाबर यांना माहिती घेण्यास सांगितले. अमित बाबर यांनी माहिती घेतली असता संबंधित हॉटेलमध्ये रंग बरसे कार्यक्रम होणार असल्याचे व त्यासाठी युवक युवती जमा होत असल्याचे त्यांना समजले. दरम्यान, या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी हा कार्यक्रम सुरू न करण्याच्या सुचना आयोजकांना दिल्या. यावेळी आयोजकांनी आयत्या वेळेला पोलिसांकडे परवान्याची मागणी केली. परंतू पोलिसांनी तो परवाना देण्यास नकार दिला.
पोलिसांनी हॉटेलच्या गेटवरच थांबून येणार्‍या युवक-युवतींना तेथून हाकलून लावले. तेथे थांबल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला. याबाबतची सूचना पोलिस जीप वरील लाऊड स्पीकर वरून पोलिसांनी वारंवार दिली. तरीही दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अनेक युवक-युवती जमावाने हॉटेलच्या परिसरात रेंगाळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांनाही तेथून पांगवले. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस हॉटेलच्या गेटवर पोहोचले होते. त्यानंतर साडेतीन ते चार वाजेपर्यंत पोलीस फौजफाटा हॉटेलच्या परिसरात येणार्‍या युवक-युवतींना परत जाण्याच्या सूचना करत होता. अशा प्रकारे कोणतीही परवानगी न घेता हॉटेलमध्ये आयोजित केलेला रंग बरसे कार्यक्रम पोलिसांनी उधळून लावला. या कार्यक्रमामध्ये विविध ठिकाणाहून युवक-युवती आले होते. त्यामध्ये काही जण गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले होते.

COMMENTS