Homeताज्या बातम्यामनोरंजन

रश्मिकाकडून पुष्पा 2 सेटवरचा फोटो शेअर

पुष्पा 2' ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असून ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाशी संबंधित अपडेट्स मिळविण्यासाठी चाहते उत्सुक

चीनने ’एलएसी’ वर तैनात केल्या 3 सशस्त्र ब्रिगेड
आजचे राशीचक्र शनिवार,११ डिसेंबर २०२१ अवश्य पहा | LokNews24
महापुरूषांच्या अवमानाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा  

पुष्पा 2′ ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असून ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाशी संबंधित अपडेट्स मिळविण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता अलीकडेच अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने एक नवीन अपडेट शेअर केले आहे. रश्मिकाने खुलासा केला आहे की, सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. रश्मिकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. पुष्पा 2′ मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक पोस्ट या वर्षाच्या सुरुवातीला शेअर करण्यात आला होता. यामध्ये तो साडी नेसलेला दिसत होता. अभिनेत्याच्या चेहऱ्यावरील मेकअप लाल आणि निळ्या रंगाने दिसत होता. तो बांगड्या, दागिने, कानातले आणि नाक पिन घातलेला दिसला. या चित्रपटातील रश्मिका मंदान्नाचा लूकही लवकरच शेअर केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुढील वर्षी हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. मात्र, अद्याप रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.

COMMENTS