Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजेश क्षीरसागरांकडून दिडशे महिलांना साड्या वाटप

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम

बीड प्रतिनिधी - समाजसेवा हिच ईश्वर सेवा म्हणून कायम सामाजिक कामात सर्वात पुढे राहून गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे जनसेवक तथा नगरसेवक राजेशदाद

जैवविविधता जपणे हि खरी गरज-डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड; राजा राममोहन रॉय सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे प्रणेते-आनंद गायकवाड
धक्कादायक…भाच्याचा मामीवर बलात्कार |LOKNews24
इस्राईल येथे रोजगाराची संधी

बीड प्रतिनिधी – समाजसेवा हिच ईश्वर सेवा म्हणून कायम सामाजिक कामात सर्वात पुढे राहून गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे जनसेवक तथा नगरसेवक राजेशदादा क्षीरसागर यांच्याकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक सामाजिक उपक्रम घेत गोरगरिब कुटूबितील दिडशे महिलांना सौ.भारतीताई राजेशदादा क्षीरसागर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन नगरसेवक राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली दिपा काळे, शितल डरपे यांनी केले होते.
अनावश्यक खर्चाला फाटा देत एक सामाजिक पद्धतीने जयंती साजरी केली पाहिजे या उद्देशाने नगरसेवक राजेशदादा क्षीरसागर यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाहूनगर भागातील गोरगरिब दिनदुबल्या महिलांना साड्या वाटपाचे कार्यक्रम दि.14 एप्रिल रोजी आयोजित करत नगरसेविका सौ.भारतीताई राजेशदादा क्षीरसागर यांच्या हस्ते दिडशे महिलांना  शाहूनगर भागातील महात्मा गौतम बुद्ध कॉलनी येथील बुध्द विहार जागेमध्ये कार्यक्रम घेवून साड्या वाटप करण्यात आले. यावेळी मंदा वंजारे, मिनाक्षी औसरमल, तेजस्वीनी शिंदे, संगिता वाघमारे, हिराबाई फुलवरे, प्रिया वाणी, पार्वती काळे, सुनिता काळे, आशा चंदनशिव, हिना कांबळे, कौसल्याबाई वाघमारे, गयाबाई गायकवाड, अंजली बससोडे, सविता गायकवाड, जाईबाई चव्हाण, रेखा चव्हाण, रेश्मा शिनगारे, रेखा शेजवळ, सविता जाधव, राणी गायकवाड, शांताबाई सुरवसे, मिनाक्षी काळे, रजनी गायकवाड, पुजा काळे, नम्रता चव्हाण, प्रिती सोनवणे, नागरबाई लोंढे, सोनी वाघमारे, वृदावणी वाघमारे, मनिषा ओव्हाळ, रेखा पवळ यांच्यासह आदी महिलांना साड्या वाटप करण्यात आले.
सौ.भारतीताईंच्या हस्ते केले वाटप
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता शाहूनगर भागातील गोरगरिब महिलांना साड्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सौ.भारतीताईं राजेशदादा क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्याच हस्ते दिडशे महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. यावेळी विविध भागातीत महिला भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS