Homeताज्या बातम्यासातारा

सुंदरगडावर श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते शस्त्र पूजन

सुंदरगड : शस्त्र पूजन करताना सत्यजीतसिंह पाटणकर. पाटण / प्रतिनिधी : पाटण महालातील प्रमुख असलेल्या सुंदरगड (दात्तेगड) वर दसर्‍याचे तोरण बांधून श्री

व्यापार्‍याच्या मुलाच्या अपहरणात चौघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राज्यमंत्रीही घेणार शपथ
भाजप आमदार जयकुमार गोरेंचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला
सुंदरगड : शस्त्र पूजन करताना सत्यजीतसिंह पाटणकर.

पाटण / प्रतिनिधी : पाटण महालातील प्रमुख असलेल्या सुंदरगड (दात्तेगड) वर दसर्‍याचे तोरण बांधून श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले. यावेळी गडावरील ध्वज पूजन, देव-देवतांचे पुजन गड प्रदिक्षणा जागरण गोंधळ करण्यात आला. इतिहासाची साक्ष असणारा पाटण महालातील सुंदरगड हे पाटण तालुक्याचे इतिहासीक वैभव आहे. या वैभवाचे जतन व संवर्धन, सुंदरगड संवर्धन समितीच्या मावळ्यांच्याकडून होत असल्याने गड व गड परिसरात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत. गड पर्यटनाच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास आजच्या पिढी समोर येत आहे. याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगितले.
यावेळी पाटण वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण पोतदार, विश्‍व हिंदू परिषदेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष यशवंतराव जगताप, सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे संदिप पाटील, टोळेवाडी गावचे माजी सरपंच नारायण डिगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटणचे वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण पोतदार म्हणाले, पाटणपासून थोड्या अंतरावर असणार्‍या सुंदरगडावर निसर्ग पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात वा् आहे. सुंदरगड आता पर्यटकांच्या पसंतीस उतरत असताना येथे पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे मनोदय पाटण वनपरिक्षेत्राचे आहे. यासाठी निसर्ग पर्यटनच्या माध्यमातून सुंदरगड पर्यटन विकासासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्ताव मंजुरी नंतर गडावर लवकरात लवकर काम सुरू करण्याचा पाटण वनपरिक्षेत्राचा मानस असल्याचे सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे संदीप पाटील यांनी बांधकाम विभागामार्फत गड विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.
प्रारंभी शस्त्र पूजन दरम्यान मयूर उबाळे प्रस्तुत जय तुळजा भवानी जागरण गोंधळ मंडळाच्या संबळ वादनाने उपस्थितांची मने जिंकली. प्रस्ताविक शिवप्रेमी मनोहर यादव यांनी केले तर शेवटी आभार युसुफ हकीम यांनी मानले. सुंदरगडावरील शस्त्र पूजन कार्यक्रमास सुंदरगड संवर्धन समितीचे शिवमावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS