Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले शहरात विविध उपक्रमांनी श्रीराम नवमी उत्साहात साजरी

अकोले ः माजी आमदार वैभवराव पिचड मित्र मंडळ, बजरंग दल व मनसेच्या वतीने काल अकोले शहरात प्रभू श्रीराम नवमी निमित्त आयोजित  विविध सांस्कृतिक कार्यक्

तोतया व्यक्ती उभी करून केले खरेदीखत
घरपट्टी-पाणीपट्टी थकबाकीदारांनी आणला महापालिकेला वात ; 88 हजारावर नगरकरांकडे तब्बल 203 कोटीची येणे बाकी
नेवाशात विजेचा धक्का लागून 9 म्हशींचा मृत्यू

अकोले ः माजी आमदार वैभवराव पिचड मित्र मंडळ, बजरंग दल व मनसेच्या वतीने काल अकोले शहरात प्रभू श्रीराम नवमी निमित्त आयोजित  विविध सांस्कृतिक कार्यक्रम, माजी आमदारांनी डीजेच्या तालावर धरलेला ठेका, भव्य मिरवणुका या अकोलेकरांचे विशेष आकर्षण ठरल्या. रामनवमी  निमित्ताने अकोले शहरातून रस्त्यावर ठिकठिकाणी सादर झालेले महाकाल तांडव नृत्य, महाबली हनुमानाची प्रतिकृती हे मिरवणुकीतील विशेष आकर्षण   ठरले. शहरात ठीक-ठिकाणी कार्यक्रम पहाण्यासाठी अकोलेकरांनी मोठी गर्दी केली होती. अबाल वृद्धांनी रामनवमी उत्सवाचा आनंद लुटला.
यावेळी भाजप पक्ष कार्यालयासमोर भव्य दिव्य श्रीराम मूर्ती व आकर्षक विद्युत रोषणाई केलेले रंगमंच उभारण्यात आलेला होता. यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड व खा. सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली. त्या नंतर भाजप पक्ष कार्यालया पासून डी जे तालावर भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी डी जे तालावर माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आपल्या कार्यकर्त्यासमवेत व राम भक्तांसमवेत नृत्याचा ठेका धरला होता. या मिरवणुकीत महाकाल तांडव नृत्याने अकोलेकरांना मंत्र मुग्ध केले.महाबली हनुमानाने सर्वांचे लक्ष वेधले.रामनवमी उत्सव पहण्यासाठी  अकोलेकरांनी तोबा गर्दी केली होती.  मनसेचे तालुका प्रमुख दत्ता नवले यांच्या नेतृत्वाखाली बस स्थानक परिसरात मोठे स्टेज उभारून राम नवमी निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. याशिवाय शहरासह तालु्क्यात विविध ठिकाणी रामनवमी निमित्त  श्रीराम मंदिरात भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड, खा. सदाशिवराव लोखंडे, जेष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ,जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे, शिवसेना (शिंदे गट )जिल्हा  संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, भाजप जेष्ठ नेते गिरजाजी जाधव,नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे,भाजपा तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे, सरचिटणीस राहुल देशमुख, मच्छिन्द्र मंडलिक, सचिन जोशी, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, खजिनदार धनंजय संत, बजरंग  दलाचे नेते भाऊसाहेब चव्हाण,भाजप महिला तालुकाध्यक्षा  वैष्णवी धुमाळ, शहराध्यक्ष अंजली सोमणी,माजी नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी,उपनगराध्यक्ष शरद नवले, नगरसेवक सागर चौधरी, विजय पवार, हितेश कुंभार, नगरसेविका शितल  वैद्य, प्रतिभा मनकर, कविता शेळके, जनाबाई मोहिते, माधुरी शेणकर, अमृतसागरचे संचालक आनंदराव  वाकचौरे, अप्पासाहेब आवारी, दयानंद  वैद्य, बाजार समितीचे संचालक. बाळासाहेब  सावंत, मारुती वैद्य, ज्येष्ठ नेते  प्रकाश नवले,माणिक देशमुख, परशराम शेळके, अमोल वैद्य, बबलू धुमाळ, नवनाथ मोहिते,महेश माळवे, ऋषी देशमुख, विजय देशमुख, मोसिन शेख, रवींद्र शेणकर, माधव भोर, प्रतिक वाकचौरे,सचिन उगले, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजय वाकचौरे, शहर प्रमुख गणेश कानवडे, युवा सेना जिल्हा प्रमुख महेश देशमुख, अनिल नाईकवाडी, सोमदास पवार, कैलास शेळके, प्रकाश पाचपुते, दिलीप हासे आदी उपस्थित होते.

COMMENTS