Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात कोरोना वाढीचा वेग चिंताजनक

24 तासात आढळले 6 हजार 50 नवे रुग्ण केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविय यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशामध्ये मार्चपासून कोरोना रुग्ण वाढीचा दर अचानक वाढला असल्यामुळे केंद्र सरकारसह प्रशासनाची चिंता मात्र वाढली आहे. गेल्या

सल आणि सूड ! 
पाईपलाईन दुरुस्तीसाठी लागतात तब्बल 50 लाख ; मनपाचा हा घोटाळा असल्याचा मनसेचा आरोप
लोकसंख्येचा विस्फोट

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशामध्ये मार्चपासून कोरोना रुग्ण वाढीचा दर अचानक वाढला असल्यामुळे केंद्र सरकारसह प्रशासनाची चिंता मात्र वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशात 6050 नवीन रुग्ण आढळले असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांचा आकडाही 28 हजार 303 वर पोहोचला आहे.कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. या वेळी डॉ. व्ही.के. पॉल, डॉ. राजीव बहल, महासंचालक, खउचठ आणि इतर वरिष्ठ आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, मे महिन्यात कोरोना वाढीचा दर अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या सकारात्मकता दर 3.32 टक्के आहे. मार्चच्या 31 दिवसांत कोरोनाचे 31 हजार 902 रुग्ण आढळले. त्या तुलनेत एप्रिलच्या 5 दिवसांतच 20 हजार 273 नवीन रुग्ण आढळले आहेत. मार्चमधील एकूण नवीन रुग्णांपैकी हे 63.5 टक्के आहे. सरासरी पाहिल्यास मार्चमध्ये दररोज सरासरी 1 हजार नवीन केसेस आढळून आल्या, तर एप्रिलमध्ये दररोज सरासरी 4 हजार केसेस समोर येत आहेत. संसर्गाचा दर असाच राहिला तर एप्रिलमध्ये 1.20 लाख नवीन रुग्णांची शक्यता आहे.  

देशभरात 10 व 11 एप्रिल रोजी मॉक ड्रिल – केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया यांनी शुक्रवारी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी सर्व राज्यांना 10 आणि 11 एप्रिल रोजी रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधांचे मॉक ड्रिल करण्यास सांगितले. 8 आणि 9 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकार्‍यांसोबत तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. मांडविया म्हणाले की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. या दरम्यान, कोविड चाचणी आणि जीनोम सिक्वेन्सिंगसह, कोविड नियमांचा प्रसार वाढविण्यावर चर्चा झाली. आपण सतर्क राहायला हवे आणि भीती पसरवू नये, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्रात कोरोनाचे 3 बळी; लसीचा तुटवडा – महाराष्ट्रात कोरोनामुळे गेल्या चोवीस तासांमध्ये तीन कोरोना रुग्णााचा मृत्यू झाला असून 803 नवे रुग्ण आढळले आहेत. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, दुसरीकडे पुणे, कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये लसीचा तुटवडा आहे. लस पुरवठा केव्हा होणार, असा सवाल नागरिक करत आहेत. देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढ आहे. सध्या पुणे महापालिकेचे कोरोना लसीकरण बंद आहे. महापालिकेच्या रुग्णालयातील लस साठा संपल्याने नागरिक वैतागलेत. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि कोर्बेव्हॅक्स या तिन्ही लसी येथे मिळत नाहीत. तर कोव्हॅक्सिन लसीचे जवळपास 1000 डोसची एक्सपायरी डेट संपली आहे.

COMMENTS