Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करु : ना. उदय सामंत

सातारा / प्रतिनिधी : प्राज्ञपाठशाळा मंडळाने तयार केलेले ग्रंथ व खंड हे राष्ट्रासाठी दिशादर्शक असून प्राज्ञपाठशाळेच्या विकासासाठी शासनाकडून निधी द

विहिरीत पडलेल्या गव्याला वनविभागाकडून जिवदान
राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना विद्यार्थी दिनी कोमात
कामे व्यवस्थीत करा अन्यथा कार्यक्रम : निशिकांत पाटील

सातारा / प्रतिनिधी : प्राज्ञपाठशाळा मंडळाने तयार केलेले ग्रंथ व खंड हे राष्ट्रासाठी दिशादर्शक असून प्राज्ञपाठशाळेच्या विकासासाठी शासनाकडून निधी दिला जाईल, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांनी वाई येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दिक्षीत, प्राज्ञपाठशाळा मंडळाचे सचिव अनिल जोशी, भालचंद्र मोने, डॉ. निरज हातेकर उपस्थित होते.
भारतीय संस्कृती अभ्यासण्यासाठीचे प्राज्ञपाठशाळा मंडळ हे केंद्र आहे. हे मंडळ वास्तवाला धरुन काम करत आहे. प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या विकासासाठी लवकरच मुंबईत बैठक घेतली जाईल. प्राज्ञपाठशाळा मंडळाने मोठ्या ग्रंथांची व खंडांची निर्मिती केली आहे. यापुढेही निर्मितीसाठी शासनाकडून मदत दिली जाईल. प्राज्ञपाठशाळा मंडळ भारतीय संस्कृतीचे संशोधन केंद्र व्हावे यासाठी मुलभूत सुविधांसाठी निधी दिला जाईल. प्राज्ञपाठशाळा मंडळ हे देशाला दिशा देणारे आहे. प्राज्ञपाठशाळा मंडळासाठी शासनाकडून जे-जे करावे लागेल ते केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आ. कपिल पाटील म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राज्ञपाठशाळा मंडळाला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी प्रतिसाद दिला होता. प्राज्ञपाठशाळा मंडळ हे भारतीय संस्कृतीचे संशोधन केंद्र आहे. या प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या पाठीशी यापुढे शासन ठामपणे उभे राहील, असेही ना. सामंत यांनी बोलताना स्पष्ट केले.

COMMENTS