Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांवरील हल्ल्याचा राहात्यात निषेध

 राहाता : काँग्रेस पक्षाचे अधिकृत प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राहाता तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राहाता पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लोकशाही व्यवस्थेत वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक असले तरी त्या मतभेदांना उत्तर देण्यासाठी हिंसा, दडपशाही किंवा गुंडगिरीचा मार्ग स्वीकारणे अत्यंत निंदनीय आहे. अशा प्रकारच्या घटना या केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात करणाऱ्या आहेत. या प्रकरणामागे राजकीय द्वेषातून प्रेरित काही गुंड प्रवृत्तीच्या घटकांचा हात असल्याची जनतेत तीव्र भावना असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे निवेदन राहाता पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी यांना देण्यात आले. यावेळी राहाता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. पंकज लोंढे यांनी दोषींवर कठोर कारवाई करून लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची मागणी केली.  शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारावर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीची गळचेपी करण्यासारखे आहे. अशा भ्याड कृत्यांना काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.” या प्रसंगी उत्तमराव मते, ज्ञानेश्वर वर्पे, राजेंद्र निर्मळ, अमोल आरणे, मुन्नाभाई फिटर, अनिश शेख आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इराणमध्ये आंदोलनांना हिंसक वळण; 217 जणांचा मृत्यू
शेतकर्‍यांच्या आत्महत्येस जबाबदार शेतकरी विरोधी कायद्यांची होळी
मुंबईत सभा; भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात किसान सभेची ‘आरपार’ आंदोलनाची घोषणा

 राहाता : काँग्रेस पक्षाचे अधिकृत प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राहाता तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राहाता पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लोकशाही व्यवस्थेत वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक असले तरी त्या मतभेदांना उत्तर देण्यासाठी हिंसा, दडपशाही किंवा गुंडगिरीचा मार्ग स्वीकारणे अत्यंत निंदनीय आहे. अशा प्रकारच्या घटना या केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात करणाऱ्या आहेत. या प्रकरणामागे राजकीय द्वेषातून प्रेरित काही गुंड प्रवृत्तीच्या घटकांचा हात असल्याची जनतेत तीव्र भावना असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हे निवेदन राहाता पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी यांना देण्यात आले. यावेळी राहाता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. पंकज लोंढे यांनी दोषींवर कठोर कारवाई करून लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची मागणी केली. 

शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारावर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीची गळचेपी करण्यासारखे आहे. अशा भ्याड कृत्यांना काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.” या प्रसंगी उत्तमराव मते, ज्ञानेश्वर वर्पे, राजेंद्र निर्मळ, अमोल आरणे, मुन्नाभाई फिटर, अनिश शेख आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS