Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरोड्यातील फरारी तडीपार गुंड जेरबंद

दहिवडी / प्रतिनिधी : तब्बल नऊ गुन्हे दाखल असलेला, तसेच फलटण येथील दरोड्याच्या गुन्ह्यात फरारी असलेला तडीपार गुंड दीपक नामदेव मसुगडे (वय 22, रा. र

सातार्‍यातील पुढील वर्षीचा दसरा महोत्सव राज्य शासनाच्या सहकार्याने : ना. शंभूराज देसाई
औंधच्या तनपुरे कुटुंबियांकडून गाईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी मुलावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार

दहिवडी / प्रतिनिधी : तब्बल नऊ गुन्हे दाखल असलेला, तसेच फलटण येथील दरोड्याच्या गुन्ह्यात फरारी असलेला तडीपार गुंड दीपक नामदेव मसुगडे (वय 22, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) याला तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी जेरबंद केले.
दीपक मसुगडे गुंडाची पुसेगाव, दहिवडी, फलटण, कोरेगाव या परिसरात मोठी दहशत होती. त्याच्यावर जबरी चोरीचे 5, घरफोडीचा 1, खुनाचा प्रयत्न 1, गर्दी मारामारी 1 व चोरी 1 असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिस अधीक्षकांनी माण, खटाव, कोरेगाव व फलटण या चार तालुक्यांतून एक वर्षाकरिता हद्दपार केले होते. तडीपार कालावधीतील फलटण पोलिस ठाणे हद्दीत येथील एक दरोड्याचा गुन्ह्यात सुद्धा तो फरारी होता.
तडीपार कालावधीत 15 नोव्हेंबर रोजी तडीपार आदेशाचे उल्लंघन करून तो सत्रेवाडी (ता. माण) येथे आल्याची माहिती दहिवडी पोलिसांना मिळाली. सपोनि संतोष तासगावकर यांनी सहकार्‍यांच्या मदतीने सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याच्यावर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, उपविभागीय पोलहस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तासगावकर, सहायक फौजदार अशोक हजारे, हवालदार संजय केंगले, पोलीस नाईक रवींद्र बनसोडे व प्रमोद कदम यांनी ही कारवाई केली.

COMMENTS