Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकशाही रक्षणाची जबाबदारी सांगणारे साहित्य संमेलन ः रतनलाल सोनाग्रा

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : स्नेह कलाविष्कार संस्था पुणे आयोजित पहिले जय भीम साहित्य संमेलन नुकतेच आचार्य रतनलालजी सोनाग्रा यांच्या अध्यक्षते खाली

राहाता नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावाजवळ आढळला मृतदेह
डोक्यात दांडा मारून एकाचा खून
रूग्ण सेवकांची सोय झाल्यास अनेक ठिकाणी कोवीड सेंटर सुरू होतील- ऍड रविकाका बोरावके

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : स्नेह कलाविष्कार संस्था पुणे आयोजित पहिले जय भीम साहित्य संमेलन नुकतेच आचार्य रतनलालजी सोनाग्रा यांच्या अध्यक्षते खाली बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे उत्सवात पार पडले. संमेलनाचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई होते. तर कार्याध्यक्ष राम सर्वगोड हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील न्यायाधीश वसंतराव पाटील,
साहित्यिक सुभाष सोनवणे, अ‍ॅड. वैशाली चांदणे, डॉक्टर सत्येंद्र चव्हाण पुणे, कवी संमेलनाध्यक्ष जेष्ठ कवी सितारामजी नरके होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात आचार्य सोनाग्रा यांनी वास्तववादी अनेक मुद्यांवर भर देत. लोकशाही रक्षणाची जबाबदारी सांगणारे हे साहित्य संमेलन आहे असे मत व्यक्त केले. ह्या वेळी प्रमुख पाहुणे न्यायाधीश वसंतराव पाटील, साहित्यिक सुभाष सोनवणे, डॉ. सत्येंद्र चव्हाण आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रानकवी जगदीपजी वनशिवे यांनी केले. कवी संमेलनामध्ये अनेक निमंत्रित कवींनी सहभाग नोंदवला. प्रगती मोरे, आनंदा ढाले, दीप्ती नेहर, दिनेश कांबळे ,आनंदा भारमल, आनंदा साळवे यासह अनेक मान्यवर कविंनी आपल्या काव्यरचना सादर केल्या. साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवना वरील गीत गायनांचा सुंदर असा कार्यक्रम पार पडला. गीतगायनामध्ये महाराष्ट्रातील काही मान्यवर गायिकांनी व गायिकेंनी सहभाग नोंदवला. सदर साहित्य संमेलनामध्ये लेखक राम सर्वगोड यांच्या नवा समाज ह्या पुस्तकाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून समाज जाणीवा संपन्न असणार्‍या काही जेष्ठ समाज बांधवांना यावेळी संमेलनाध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

COMMENTS