Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिळकत कर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या मिळकती सिल: थकबाकी भरण्याचे पाचगणी नगरपरिषदेचे आवाहन

पाचगणी : नगरपरिषदेने कर वसुलीसाठी बनवलेले पथक. पाचगणी / वार्ताहर : पाचगणी नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता कराच्या थकबाकीची वसुली करणेकामी मुख्याधिकार

कराड शहरातील वखारीला मध्यरात्री भीषण आग
खटाव तालुक्यात गौण खनिज उत्खनन प्रकरणी जेसीबीसह दोन ट्रॅक्टरवर कारवाई
तामकणेच्या नाथ मंदीराच्या कामासाठी मदतीचे आवाहन

पाचगणी / वार्ताहर : पाचगणी नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता कराच्या थकबाकीची वसुली करणेकामी मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या वसुली पथकाने आज नगरपरिषद हद्दीत मालमत्ता कर थकबाकी वसुली मोहिमेस प्रारंभ केला. यामध्ये काही थकबाकीदारांच्या मिळकती सिल केल्या. यामध्ये दोन मिळकत धारकांनी त्यांनी तात्काळ कर भरणा केल्याने त्यांच्या मिळकतीचे सिल काढण्यात आले. तरी सर्व मिळकत धारकांनी त्वरित कराचा भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
थकबाकी कराची रक्कमेची वसुली करणेकामी शॉपिंग सेंटरमधील एक गाळा, महाराष्ट्र बँक येथील खंबोलजा यांचा वरचा मजला, नचिकेत हायस्कूल, ओशो अपार्टमेंट मधील एक फ्लॅट, साई बार, आनंद भवन भागातील एक बंगला, वाईकर कॉटेज माधिक एक कॉटेज, खालचे गावठाण मधील एक मिळकत आदी मिळकती सील करण्यात आल्या. याकामी नगरपरिषदेचे वसुली पथक प्रमुख प्रणव पवार कर अधीक्षक, धनंजय थोरात मिळकत व्यवस्थापक, अमोल पवार रचना सहायक प्रशांत सरोदे संगणक अभियंता, जयंती गुजर लिपिक, कालिदास शेंडगे लिपिक, राजश्री सणस लिपिक आणि इतर कर्मचारी सुर्यकांत कासुर्डे, तानाजी कासुर्डे, प्रकाश हिरवे, अशपाक पठाण, नितीन मर्ढेकर, शशिकांत मोहिते, संदीप बगाडे यांनी सहभाग घेतला.
यामध्ये नचिकेत हायस्कूल व साई बार यांनी थकबाकी रक्कम तात्काळ भरल्याने त्यांच्या मिळकतीचे सील काढण्यात आले. तरी सर्व थकबाकीदारांनी मिळकत कराची रक्कम त्वरित भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.

COMMENTS