Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बॉर्डर दौड स्पर्धेत वडजलच्या सौ. तृप्ती काटकर-चव्हाण प्रथम

म्हसवड / वार्ताहर : नुकत्याच झालेल्या जैसलमेर ते लोन्गेवाला शंभर मैल (160 किमी) हेल रेस सीरिजमधील बॉर्डर दौड स्पर्धेत वडजल (ता. माण) येथील सौ. तृ

नेवासा तालुका जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी “भारतपुरी गोसावी” यांची निवड
सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे चोरीचा उलगडा; नातेवाईकाच्या बचावासाठी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची धडपड
घाणबी येथे कोसळला विजेचा खांब; पाटण महावितरण कार्यालयाचा अनागोंदी कारभार

म्हसवड / वार्ताहर : नुकत्याच झालेल्या जैसलमेर ते लोन्गेवाला शंभर मैल (160 किमी) हेल रेस सीरिजमधील बॉर्डर दौड स्पर्धेत वडजल (ता. माण) येथील सौ. तृप्ती चव्हाण यांनी 27 तास 38 मि. मध्ये स्पर्धा जिंकून सन्मान प्राप्त केला.
दिवसा 35 अंश आणि रात्री पाच अंश तापमान असलेल्या वातावरणातील उतार चढाव यामुळे अत्यंत कठीण समजली जाणारी ही रेस 50, 100 किमी आणि 100 मैल (160 किमी) या आवर्तनामध्ये घेण्यात आली. धावण्याच्या क्रिडा स्पर्धेत 48 स्पर्धकांनी 100 मैल श्रेणीत भाग घेतला होता. त्यापैकी फक्त 30 खेळाडू शर्यत पूर्ण करू शकले. त्यांपैकी तृप्ती या एकमेव महिला धावक ठरल्या आहेत. मूळच्या वडजल गावच्या असलेल्या तृप्ती या संगणक शास्त्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचे पती भारतीय नौदलात अधिकारी आहेत. कोरोना साथीतील लॉकडाऊन कालावधीत (जून 2020) त्यांनी धावण्याचा सराव केला होता. धावण्याच्या शर्यतीस सुरुवातीस बाधा आणणारे त्यांच्या शरीराचे वजन बाधा आणत असल्याची वस्तुस्थिती निदर्शनास येताच त्यांनी दोन महिन्यात मोजकाच आहार घेऊन व्यायामाने तब्बल 18 किलो वजन कमी करण्यात यश मिळवित खेळाचा सराव करत पाया भक्कम केला.
कठीण परिश्रम व स्वयंशिस्तीच्या बळावर त्यांनी अतिशय कमी वेळात ध्येय साध्य केले. त्या स्वत: नोकरी करत असून त्यांना तीन वर्षांचे बाळ आहे. घरची सर्व जबाबदारी संभाळून केवळ एका वर्षात जाधव यांनी क्रिडा क्षेत्रात घेतलेली गरूडझेप प्रशंसनीय अशीच आहे.

COMMENTS